पद्म पुरस्काराबद्धल मोदींची मोठी घोषणा; म्हणाले आता असं नाही चालणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्काराबाबत गुरूवारी मोठी घोषणा केली. पद्म पुरस्कार घोषीत करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकताया यावी असे सांगतानाच यापूढे शिफारशींवर हे पुरस्कार दिले जाणार नाहीत असेही मोदी म्हणाले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 17, 2017, 08:14 PM IST
पद्म पुरस्काराबद्धल मोदींची मोठी घोषणा; म्हणाले आता असं नाही चालणार... title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्काराबाबत गुरूवारी मोठी घोषणा केली. पद्म पुरस्कार घोषीत करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी असे सांगतानाच यापूढे शिफारशींवर हे पुरस्कार दिले जाणार नाहीत असेही मोदी म्हणाले.

नीति आयोगाच्या वतीने दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उद्योजकांपूढे बोलताना मोदींनी ही घोषणा केली आहे.  यापूर्वी मंत्री आणि काही व्यक्तिंच्या शिफारशीवरून हे पुरस्कार दिले जात असत. मात्र, ही पद्धत बंद करून त्यात दुरूस्ती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आता या प्रक्रियेत कोणीही भाग घोऊ शकतो, अशी सुविधा आम्ही निर्माण केल्याचेही मोदींनी सांगितले.

पूढे बोलताना मोदी म्हणाले, यापूर्वी पद्म पुरस्कारासाठी मंत्री शिफारस करायचे. याचा अर्थ असा की, व्यक्ती ज्या विभागाचा मंत्री असेल तो आपल्या मंत्रालयाकडून संबंधीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिच्या नावाची शिफारस करायचा. जसे की क्रीडा क्षेत्रातून खेळाडू किंवा कोचचे नाव, एचआरडी मंत्रालयाकडून शिक्षण क्षेत्राशी संबंधीत चांगले काम करणाऱ्या व्यक्तिचे नाव सुचवले जायचे. मात्र, यापूढे असे चालणार नाही. या पूढे पद्म पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, २०१८ साठी विवीध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारांसाठी नाव नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेबर 2०१७ ही अखेरची तारीख असणार आहे. यात साहित्य, क्रीडा, शिक्षण, चिकित्सा, विज्ञान, सामाजिक कार्य, व्यापार, उद्योग यांसारख्या क्षेत्रात उत्तूंग योगदान देणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. 
पद्म पुरस्कारांसाठी नोंदणी करण्यासाठी गृहमंत्रालयाकडून एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ‘www.padmaawards.gov.in’ या पोर्टलला भेट द्या.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x