मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. मागील २ रेल्वे अपघातामुळे प्रभूंनी राजीनामा देऊ केला आहे. सुरेश प्रभूंनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. नैतिक जबाबदार म्हणून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली पण पंतप्रधानांनी त्यांना अजून थांबण्यास सांगितलं आहे.
यूपीमध्ये चार दिवसात २ रेल्वे रेल्वे रुळावरुन घसरल्या. त्यानंतर विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांच्या राजीमाम्याची मागणी केली. रेल्वे बोर्डा चेअरमन ए.के मित्तल यांनी देखील राजीनामा दिला आहे. प्रभूंनी ट्विट करत म्हटलं की, मंत्री म्हणून तीन वर्षापेक्षा कमी काळात मी रेल्वेला उत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत घेतली. या रेल्वे दुर्घटनेवर त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'अपघात, प्रवाशांची जीवितहानी मुळे मला दु:ख झालं आहे. यामुळे मी राजीनामा दिला पण पंतप्रधानांनी मला थांबण्यास सांगितलं आहे.
I met the Hon'ble Prime Minister @narendramodi taking full moral responsibility. Hon’ble PM has asked me to wait. (5/5)
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 23, 2017
I am extremely pained by the unfortunate accidents, injuries to passengers and loss of precious lives. It has caused me deep anguish (4/5)
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 23, 2017