सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला… जुन्या Video मुळे वरुण धवन ट्रोल

सध्या वरुणच्या याच चित्रपटाशी संबंधित एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात वरून धवन दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही नरगिस फाखरीला किस करत राहिला. 

पुजा पवार | Updated: Jan 13, 2025, 08:52 PM IST
सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला… जुन्या Video मुळे वरुण धवन ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Varun Dhawan : अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. वरुणने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका केल्या असून 2014 मध्ये त्याने 'मैं तेरा हीरो' नावाचा चित्रपट केला. या चित्रपटात वरुण धवनने इलियाना डिक्रूज आणि नरगिस फाखरी सोबत काम केले. सध्या वरुणच्या याच चित्रपटाशी संबंधित एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात वरून धवन दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही नरगिस फाखरीला किस करत राहिला. यावरून सध्या नेटकरी वरुणला ट्रोल करत आहेत. 

सीन कट झाल्यावरही अभिनेत्रीला किस करत राहिला : 

व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता वरुण धवन आणि नरगिस फाखरी हे दोघे 'मैं तेरा हीरो' या चित्रपटासाठी एक सीन शूट करताना दिसतायत. या रोमँटिक सीन दरम्यान वरुण अभिनेत्रीला किस करत असतो. परंतु तो या सीनमध्ये इतका गुंग होतो की दिग्दर्शकाने कट... कट... कट! म्हटल्यावरही तो अभिनेत्रीला किस करणं सुरूच ठेवतो. दरम्यान वरुण सोबत हा सीन करणारी अभिनेत्री नरगिस फाखरी आणि जवळपासचे क्रू मेंबर्स देखील हसताना दिसतात. भानावर आल्यावर वरुण अभिनेत्रीपासून दूर होतो. 

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

पाहा व्हिडीओ :

वरून धवनला ट्रोल करतायत नेटकरी : 

वरुणचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होत असून यावरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “ठरक, ठरकी, ठरकुला.” तर दुसऱ्याने लिहिले, "ओवरएक्टिंगची दुकान आणि बेशरम". तर एकाने लिहिले की, "याला बॉलिवूडमधून काढून टाका त्याने खूप नाव खराब केलं आहे". तर एकाने लिहिले  की, "याला बॅन करायला हवे". 

varun dhawan

 नरगिसने म्हटले वरुण माझा आवडता को-स्टार : 

ETimes ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री नरगिस फाखरीने म्हटले होते की, "वरुण हा तिचा आवडता सह-कलाकार आहे. मला वाटते की मी वरुण धवनसोबत सेटवर सर्वात जास्त मजा केली. तो ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला आहे आणि खूपच मजेशीर व्यक्ती आहे."