pm modi

पंतप्रधान मोदींचा देशातील विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी ११ वाजता देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हे भाषण दिल्लीच्या विज्ञान भवनात होणार आहे.

Sep 11, 2017, 11:02 AM IST

पंतप्रधानांच्या संपत्तीत झाली आहे एवढी वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीविषयीही सर्वांना उत्सुकता आहे. त्यांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे.  

Sep 9, 2017, 06:08 PM IST

पंतप्रधान मोदींचा म्यानमारला मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार मधील राखीन प्रांतात होणा-या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला. भारत म्यानमारमधील शांतीसाठी हरएक प्रकारची मदत करेल, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली.

Sep 7, 2017, 10:43 AM IST

पंतप्रधान मोदींनी म्यानमारमधल्या ऐतिहसिक पॅगोडाला दिली भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यमार दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी रंगून मधल्या शेड्योंग पॅगोडामध्ये दाखल झाले आहे. म्यानमारमधल्या ऐतिहसिक महत्वाच्या पॅगोडाला मोदींनी भेट दिली. यानंतर ते म्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहणार आहे.

Sep 7, 2017, 10:31 AM IST

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात महत्त्वाची भेट

जगभरातील चालू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात स्वतंत्रपणे भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जग दोन गटांमध्ये वाटलं जात असतांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होत आहे. उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी जपान, अमेरिकेसह इतर शक्तीशाली देश तयारी करत असतांना रशिया आणि चीन यांनी मात्र याला विरोध केला आहे.

Sep 4, 2017, 05:09 PM IST

शिवसेनेला लोकसभेचं उपसभापतीपद देण्यास भाजप तयार- सूत्र

आज होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात, मंत्रीपदाच्या यादीमध्ये सध्यातरी शिवसेनेची वर्णी लागली नसली तरी, शिवसेनेला लोकसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.

Sep 3, 2017, 09:30 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्नथानम ही नावं मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 3, 2017, 09:08 AM IST

प्रेम, त्याग आणि बलिदानाचं प्रतिक म्हणून बकरी ईद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशातील मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 2, 2017, 11:29 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता

होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Aug 31, 2017, 05:45 PM IST

अखेर राम रहिम हिंसा प्रकरणावर बोलले पंतप्रधान मोदी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यात ३६ जणांचा बळी गेलाय तर २५० हून अधिक जण जखमी झाले.

Aug 27, 2017, 11:34 AM IST

भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर होऊ देणार नाही -पंतप्रधान देउबा

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. करार झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारील देशांसोबत आधी संबंध आणि सबका साथ सबका विकास या गोष्टीचं कौतूक करतो.' 

Aug 24, 2017, 04:08 PM IST