या '3' प्रश्नांसाठी दिव्यांका त्रिपाठीने मागितली नरेंद्र मोदींकडे ट्विटरवर मदत

हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहचलेल्या दिव्यांका त्रिपाठीने महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकारने गांभिर्याने पहावे याकरिता ट्विटरची मदत घेतली आहे.

Updated: Aug 17, 2017, 03:35 PM IST
या '3' प्रश्नांसाठी दिव्यांका त्रिपाठीने मागितली नरेंद्र मोदींकडे ट्विटरवर मदत  title=

मुंबई : हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहचलेल्या दिव्यांका त्रिपाठीने महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकारने गांभिर्याने पहावे याकरिता ट्विटरची मदत घेतली आहे.

दिव्यांकाने नरेंद्र मोदींना महिला सुरक्षेच्या बाबतीत हे 3 प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.  

दिव्यांका म्हणते, ' बलात्कारांना शिक्षा करण्यासाठी 'स्वच्छता मोहिमेअंतर्गत (बलात्कार्‍यांना) समाजातील कचरा समजून त्यांच्यापासून आमची सुटका करा.'   

दुसर्‍या ट्वीट मध्ये दिव्यांका म्हणते, ' महिलांकडे वाईट नजरेने पाहणार्‍या पुरूषांना कठोर शासन करा. पुन्हा वाईट नजरेने ते कोणत्याच स्त्रीकडे पाहू शकले नाही पाहिजेत. तुमच्यावर आमचा विश्वास आहे'.  

 

तर तिसरं ट्वीट करताना दिव्यांका म्हणाली, ' मुलाच्या हव्यासापायी मुलींची होणारी स्त्री भ्रूणहत्या फारच वाईट आहे. मुलींना जन्म दिल्यास त्यांना सांगायच कसं की तुला स्वर्गातून नरकात का ढकललं आहे ?  

दिव्यांकाच्या कोणत्याही मेसेजला अजून नरेंद्र मोदींनी रिप्लाय दिलेला नाही.  पण इतर ट्विटरकरांनी तीला पाठिंबा देत लाईक आणि रिट्विट केले आहे.