पंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे काही दिवसांपूर्वी पदमुक्त झाले. त्यांनी आज ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी त्यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे. 'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनाला भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे. 

Updated: Aug 3, 2017, 04:42 PM IST
पंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र title=

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे काही दिवसांपूर्वी पदमुक्त झाले. त्यांनी आज ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी त्यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे. 'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनाला भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे. 

मोदींनी पत्राल लिहिलं आहे की, तुम्ही आता एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहात. राष्ट्रपती असताना तुम्ही या देशाला खूप प्रेरणा दिली आहे. तीन वर्षापूर्वी नवी दिल्लीत मी नवीन होतो. येथे काम करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण या काळात तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे मला मार्गदर्शन केलं आणि मदत केली. तुमच्याकडे मोठा राजकीय, आर्थिक, वैश्विक अनुभव आहे ज्याचा फायदा मला आणि माझ्या सरकारला वेळोवेळी झाला आहे. आपण दोघांचा राजकिय प्रवास वेगळा, आपले विचारही वेगळे होते. मी फक्त एका राज्यातून काम करून आलो होतो. तरीही तुमच्या अनुभवाच्या मदतीने आपण एकत्र काम केलं. 

तुम्ही माझ्यासाठी नेहमी स्नेही आणि माझी काळजी घेणारे होतात. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुम्ही केलेला एक फोन मला नवी ऊर्जा द्यायचा. माझ्या लांबलचक चालणाऱ्या बैठका आणि कॅम्पन्सनी भरलेल्या दिवसांमध्ये तुमचा येणार एक फोन माझ्यात नवा उत्साह निर्माण करायचा. नवा उत्साह मिळविण्यासाठी तुमचा फक्त एक फोन पुरेसा असायचा.

संसदेत निरोप समारंभाच्या वेळी प्रणव मुखर्जींनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी मोदींनी प्रणव मुखर्जी यांचे पत्रातून आभार मानले आहेत. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींनी दिलेलं पत्र ट्विट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ट्विटला उत्तर दिलं आहे. 'प्रणव दा! तुमच्या सोबत काम केलेल्या दिवसांना मी नेहमीच लक्षात राहिल, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.