marathi news

IND vs SA : टीम इंडियाचा थाटात विजय! कुलदीपच्या 'पंच'समोर साऊथ अफ्रिकेचं लोटांगण

IND vs SA T20I Series: निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून मालिका बरोबरीत सोडवण्यात सूर्या अँड कंपनीला यश आलं आहे.

Dec 14, 2023, 11:59 PM IST

पक्षी फांदीवर झोपतात मग खाली का पडत नाहीत?

Birds sleep on branches: पक्षांना झोपेत असतानाही शिकारी आल्याची चाहूल लागते. पक्षी झोपेत फांदीवरुन पडत नाहीत कारण त्यांच्या बुद्धीचा एक भाग जागृत असतो. पक्षी पंजाने फांदीवरची पकड घट्ट करतात. यामुळे पक्षी फांदीवर झोका घेताघेताही झोपतात. 

Dec 14, 2023, 06:58 PM IST

रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन

Panvel Madgaon Special Train:  रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

Dec 14, 2023, 06:30 PM IST

'कभी खूशी कभी गम' @ 22; करीना कपूरनं शेअर केल्या आपल्या सिनेमाच्या खास आठवणी

Kabhi Khushi Kabhi Gam Kareena Kapoor: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे करीना कपूरचा. तुम्हाला माहिती आहे का की 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला चक्क 22 वर्षे पुर्ण झाली आहेत. 

Dec 14, 2023, 06:19 PM IST

धक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले

Beed News:  प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. 

Dec 14, 2023, 05:02 PM IST

काकांच्या निधनानं अभिनय बेर्डे भावूक; शेअर केला फोटो

Ravindra Berde Death: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल 13 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झाले. आपल्या काकांच्या स्मृतीप्रत्यर्थ अभिनेता अभिनय बेर्डे यानं खास पोस्ट शेअर केली आहे. 

Dec 14, 2023, 04:31 PM IST

फेसबुकवरचा मित्र चाकू घेऊन लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला..पुढे झालं ते धक्कादायक..

UP Crime: आरोपी मनोजने पत्नीच्या छाती आणि हातावर चाकूने वार केले. 

Dec 14, 2023, 12:31 PM IST

थेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य

Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशाच्या राजकारणात भाजप खेळणार मास्टर स्ट्रोक; मुख्यमंत्रीपद नव्हे, या बड्या नेत्यांवर सोपवणार मोठी जबाबदारी 

 

Dec 14, 2023, 12:15 PM IST

सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. 

Dec 14, 2023, 11:18 AM IST

मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण; 'या' परिसरातील हवा अतिशय वाईट, तुम्ही इथंच राहताय का?

Mumbai News : मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून धुरक्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं शहरातील दृश्यमानचा मोठ्या फरकानं कमी झाली आहे. थोडक्यात शहराला प्रदूषणाचाच विळखा बसला आहे. 

 

Dec 14, 2023, 09:46 AM IST

अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

Maharashtra Politics : पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय. पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान अजित पवार यांनी केलंय.

Dec 13, 2023, 10:08 PM IST

Mokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!

Mokshada Ekadashi 2023 : वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. मात्र यावर्षी 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अतिशय खास असते. 

Dec 13, 2023, 04:55 PM IST

Parliament Security Breach: 'आमचे आई-वडील इतके...'; अटक केलेली तरुणी काय म्हणाली?

Loksabha Security Breach : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या वर्षपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा सुरक्षेत मोठी कुचराई झाली आहे. बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीत उड्या मारल्या होत्या. त्याआधी बाहेर देखील एका महिलेला आणि तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Dec 13, 2023, 02:51 PM IST

'PhD करणं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतकं सोपं नाही'; विद्यार्थ्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं

Ajit Pawar PHD Statement : पीएचडी करणे म्हणजे पक्ष बदलण्यासारखं नाही, दहावी नापास अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात विद्यार्थ्यांनी राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

Dec 13, 2023, 01:12 PM IST

नसते धाडस करू नका! पोहता येत नसतानाही कुंडात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Pune News: मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या सोलापूरच्या 21 वर्षीच तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Dec 13, 2023, 09:39 AM IST