रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन

Panvel Madgaon Special Train:  रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

Pravin Dabholkar | Dec 14, 2023, 18:30 PM IST

Panvel Madgaon Special Train: रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. 

1/9

रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन

ट्रेन   Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

Panvel Madgaon Special Train: नाताळची सुट्टी आणि त्यानंतर येणारे नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण कोकण-गोव्याच्या दिशेने जातात. यामुळे रेल्वे प्रवासी संख्या वाढते. या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. 

2/9

विशेष 12 फेऱ्या

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

01427/01428 पनवेल- मडगाव-पनवेल विशेष 12 फेऱ्या असतील. 01427 पनवेल – मडगाव जं. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्री 9.10 वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे  दुसऱ्या दिवशी सकाळी 6.50 वाजता पोहोचेल. या काळात 6 फेऱ्या असतील.

3/9

मडगाव - पनवेल स्पेशल

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

01428 मडगाव - पनवेल स्पेशल मडगाव जं. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दर दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी 8.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता पनवेल येथे पोहोचेल. 

4/9

रचना

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

ही रेल्वे रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल. याची संरचना 22 डब्बे- 6 वातानुकूलित तृतीय, 4 शयनयान, 12 सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी असेल. 

5/9

पनवेल- मडगाव-पनवेल

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

01429/01430 पनवेल- मडगाव-पनवेल नवीन वर्ष विशेष २ फेऱ्या असतील. 01430 मडगाव - पनवेल नववर्ष विशेष गाडी मडगाव जं. येथून 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 11.00वाजता (एक फेरी) सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी 7.20 वाजता पोहोचेल.

6/9

नवीन वर्ष पनवेल विशेष

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

01429 पनवेल – मडगाव जं. नवीन वर्ष विशेष पनवेल 2 जानेवारी 2024 रोजी 8.20 वाजता सुटेल (एक फेरी) आणि मडगाव जंक्शन येथे  त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पोहोचेल. 

7/9

थांबे

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

ही रेल्वे रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या ठिकाणी थांबेल. 

8/9

रिझर्वेशनची सुचना

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

याची संरचना 22 डब्बे- 6 वातानुकूलित तृतीय, 4 शयनयान, 12 सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी असेल.  ट्रेन क्रमांक 01427/28 आणि 01429/30 च्या फेरीसाठी रिझर्वेशन बुकिंगची सुचना लवकरच देण्यात येईल. 

9/9

अधिकृत वेबसाइट

Central Railway Panvel Madgaon Special Train For Christmas New Year

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एनटीईएस (NTES) अॅप डाउनलोड करुनही याची माहिती मिळू शकेल.