टी सिरीजच्या मालकाच्या मुलीला कॅन्सर नव्हताच! आई म्हणाली- ‘मेडिकल ट्रॅपने’ घेतला तिशाचा जीव

टी सीरीज कंपनीचे को-ओनर कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचा चार महिन्यांपूर्वी निधन झाले. आता कृष्ण कुमारची पत्नी तान्याने लेकीच्या निधनाचं कारण सांगितलं आहे. मुलीचा मृत्यू कॅन्सरने नाही तर इतर गोष्टींमुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 29, 2024, 02:02 PM IST
टी सिरीजच्या मालकाच्या मुलीला कॅन्सर नव्हताच! आई म्हणाली- ‘मेडिकल ट्रॅपने’ घेतला तिशाचा जीव title=

अभिनेता, निर्माता आणि टी सीरीजचे सहमालक कृष्ण कुमार यांच्या मुलीचा तिशाचा चार महिन्यांपूर्वी वयाच्या 20 व्या वर्षी निधन झाले. आता पत्नी तान्या यांनी मुलीच्या निधनाचं खरं कारण सांगितलं आहे. तान्या यांनी इंस्टाग्रामवर खूप मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी तिशाच्या मृत्यूचं कारण कॅन्सर नसून इतर कारण असल्याच सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी मुलीच्या निधनाला चुकीचे कर्म आणि चुकीची मेडिकल ट्रिटमेंट कारणीभूत असल्याच सांगण्यात येत आहे. 

तान्या यांनी आपल्या मुलीबाबत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सगळ्याच गोष्टी अतिशय बारकाईने लिहिली आहेत. आपली मुलगी शेवटच्या क्षणी डिप्रेशनमध्ये नव्हती. माझी मुलगी कधीच भीती किंवा डिप्रेशनचा सामना करत नव्हती. तिने अतिशय ताकदीने या सगळ्या खडतर प्रवासाचा सामना केला आहे. ती अतिशय निडर आणि शांत अशी 20 वर्षांची मुलगी होती. 

काळ्या जादूबद्दल काय म्हणाल्या तान्या

पुढे बोलताना तान्या यांनी लिहिले की, 'कोणीही त्याच्या कर्माच्या परिणामापासून वाचू शकत नाही. दैवी न्याय, मी मागील पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘कधीकधी तुमचे संपूर्ण अस्तित्व दुसऱ्याच्या ‘वाईट कर्मा’मुळे नाहीसे होते. तत्वज्ञान काय म्हणते याने काही फरक पडत नाही, औषध हा (चुकीचा) निदान आणि (चुकीच्या) पद्धतींचा व्यवसाय आहे. तिथल्या लोकांचा 'वाईट डोळा, काळी जादू इ.' यावर विश्वास नाही हेही पटत नाही. सत्य स्वतःला प्रकट करण्याचा स्वतःचा मार्ग शोधतो आणि ते प्रकट होईल.

तान्या यांनी पुढे काय सांगितलं, जरी त्यांची मुलगी कठीण काळातून जात असली तरीही पण ती कधीच घाबळली नाही आणि डिप्रेशनमध्ये गेली नाही. तान्या यांनी सांगितले की, त्यांची मुलगी या सगळ्या प्रकरणातून जागरुकता निर्माण करु इच्छित होती. मुलीला कॅन्सर नव्हता तान्या सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला कॅन्सर अजिबात नव्हता. पहिला उल्लेख केला त्याप्रमाणे माझ्या मुलीला कॅन्सर कधीच झाला नव्हता. तिला साडे 15 वर्षांची असताना एक लस दिली होती. ज्यामधून एक ऑटोइम्युन स्थिती निर्माण झाली होती. ज्यावर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याच सांगण्यात येत आहे.