Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला अतिश्य महत्त्व आहे. साधारण वर्षाला 24 एकादशी येतात. मात्र यंदा 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितदोषांपासून मुक्तीसाठी खास मानली जाते. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे पितारांना मोक्ष मिळणे म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. त्याशिवाय या एकादशी व्रताने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशिवार्द मिळतो. (Why is Mokshada Ekadashi considered special Learn the importance mantras auspicious times puja methods and mythology salvation of pitru)
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीची सुरुवात 22 डिसेंबर 2023 शुक्रवार सकाळी 08.16 पासून 23 डिसेंबर 2023 शनिवारसकाळी 07.00 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 22 डिसेंबर 2023 ला एकादशीचं व्रत आणि पूजा करायची आहे.
एकदाशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे. प्रत्येक एकादशीचं आपलं वेगळेपणा आणि वैशिष्ट्य आहे. मोक्षदा एकादशी ही तिच्या नावातच प्रतिबिंबित करते. या एकादशीला पितरांना मोक्ष मिळवावं म्हणून पूजा विधी करता. त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होते. मोक्षदा एकादशीला गुरुवायूर एकादशी, भागवत एकादशी किंवा वैष्णव मोक्ष असंदेखील म्हणतात. केरळच्या गुरुवायूर मंदिरात मोक्षदा एकादशी मोठ्या थाटात साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी मंदिराचे दरवाजे 24 तास खुले असतात आणि रात्रभर भगवान विष्णूची पूजा करण्यात येते.
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करा. गंगा किंवा गंगेच्या पाण्यात मिसळलेल्या पाण्याने स्नान करुन पिवळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तळहातात पाणी आणि काळे तीळ ठेवा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करा. यानंतर देवघरातील भगवान विष्णूच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान आणि अभिषेक करा. आता मंदिरात धूप दिवा लावा. विष्णू मंत्रांचा जप करा.
श्री विष्णु भागवते वासुदेवाय मंत्र
ॐ नमो: भगवते वासुदेवाय ।
आता पिवळी फुलं, रोळी, सुपारी, अत्तर, पिवळं चंदन, तीळ, जव, अक्षत, दुर्वा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करावे. पूजेनंतर भगवद्गीतेचा अध्याय ऐका किंवा त्याच पठण करा. भोग म्हणून दुधाची मिठाई आणि फळं अर्पण करावी. आता विष्णु सहस्त्रनाम पाठ करावा. आता भगवान विष्णूची आरती करून प्रसादाचं वाटप करावं.
पद्मपुराणानुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची तुळशीमंजरी, अगरबत्ती इत्यादींनी पूजा केली जाते. ही एकादशी सर्वात मोठ्या पापांचाही नाश करते अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी वैखनस नावाच्या राजाने पर्वत मुनींच्या सांगण्यावरून या तिथीवर आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी व्रत केलं होतं. त्यामुळे वैखनस राजाच्या पूर्वजांची नरकातून मुक्तता झाली होती, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या तिथीवर मोक्षदा एकादशीचं व्रत केलं जातं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)