IND vs SA : टीम इंडियाचा थाटात विजय! कुलदीपच्या 'पंच'समोर साऊथ अफ्रिकेचं लोटांगण

IND vs SA T20I Series: निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून मालिका बरोबरीत सोडवण्यात सूर्या अँड कंपनीला यश आलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 15, 2023, 12:12 AM IST
IND vs SA : टीम इंडियाचा थाटात विजय! कुलदीपच्या 'पंच'समोर साऊथ अफ्रिकेचं लोटांगण title=
IND vs SA, Suryakumar Yadav, kuldeep yadav

India vs South africa : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेचा फिरकीच्या तालावर 106 धावांनी पराभव (India Won by 106 Runs) केला आहे. निर्णायक टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर मालिका बरोबरीत सोडवण्यात सूर्या अँड कंपनीला यश आलं आहे. भारताने दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना साऊथ अफ्रिकेची दैना उडाली. कुलदीप यादव (kuldeep yadav) याने 5 विकेट्स खोलल्या अन् सामना भारताच्या पारड्यात आणून ठेवला. त्यामुळे आता मालिका 1-1 ने बरोबरी सुटली आहे.

टीम इंडियाने दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना साऊथ अफ्रिकेची सुरूवात खराब झाली.  रीझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांनी अनुक्रमे 8 आणि 4 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन मार्करमने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आलं. जडेजाने मार्करमला तंबूत पाठवत टीम इंडियाचं काम सोपं केलं. मात्र, दुसरीकडे डेव्हिड मिलर पाय रोवून बसला होता. सूर्या दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर जडेजाने दुसऱ्या बाजूने कुलदीपचा मारा सुरू केला. कुलदीपने आपल्या फिरकीची जादू दाखवली अन् मिलरला बाद केलंय. त्यानंतर कुलदीपने पुढच्या ओव्हरमध्ये खेळ खल्लास केला. कुलदीपने पूढील 7 बॉलमध्ये 4 विकेट्स काढल्या अन् साऊथ अफ्रिकेला खेळ खल्लास केला. त्याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.तर रविंद्र जडेजाने 2 विकेट्स नावावर केल्या.

शुबमन गिल व यशस्वी जयस्वाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गिल आणि यशस्वी या दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताला धक्का बसला. त्यानंतर तिलक वर्मा पुढच्या बॉलवर कॅच देऊन बसला. सूर्यकुमार यादव याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 8 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने टी-20 क्रिकेटमधील चौथं शतक ठोकलं. सूर्यकुमार यादव याने यशस्वी जयस्वाल याच्यासोबत शतकी भागिदारी केली. जयस्वालने 60 धावांची महत्त्वाची खेळी केली. अखेर टीम इंडियाने 200 धावांचा टप्पा गाठला अन् साऊथ अफ्रिकेला 202 धावांचं आव्हान दिलं होतं.

आणखी वाचा - SA vs IND : साऊथ अफ्रिकेत सूर्या चमकला! ऐतिहासिक शतक ठोकत केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

साऊथ अफ्रिका : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.