VIDEO : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार? नेमकं काय घडलं

Subodh Bhave : सुबोध भावेला मुलींकडून का नकार मिळाला? पाहा व्हिडीओ

दिक्षा पाटील | Updated: Nov 29, 2024, 04:32 PM IST
VIDEO : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार? नेमकं काय घडलं  title=
(Photo Credit : Social Media)

Subodh Bhave : शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या बऱ्याच दिवसांपासून आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटातील एक धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्षितिज पटवर्धन लिखित 'नकारघंटा...' असे बोल असलेलं हे गाणं सुबोध भावेवर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्याणं इतक्यात सगळ्यांना वेड लावलं आहे. 

'हळूच मनाचं दार उघडून, रोज नवी येते आणि जाते वाजवून घंटा... नकारघंटा...' या ओळींमधूनच साधारण कल्पना प्रेक्षकांना आली असेलच. विवाह करण्याच्या सुरुवातीला सुबोध भावे लग्नासाठी मुली बघताना दिसत असून अपेक्षांमध्ये न बसल्यानं त्याला बहुतेक स्थळांकडून नकारच मिळत असल्याचं या गाण्यातून दिसतंय. सुबोधच्या आयुष्यातील ही नकारघंटा थांबून, तो बोहल्यावर चढणार का? हे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता आणखी वाढली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गाण्याबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, ''चित्रपटाची कथा पुढे नेणारं हे एक मजेदार गाणं आहे. वय वाढलं की लग्न जमवणं हे एक मोठं आव्हान असतं आणि अशातही एखादी मनासारखी मुलगी मिळालीच तर तिच्या अपेक्षांच्या यादीत बसणं, हे त्याहूनही मोठं आव्हान असतं. मग अशा वेळी पचवावा लागतो, तो नकार... हेच गंमतीशीररित्या या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या गाण्याचे बोल, संगीत आणि आदर्श शिंदे यांचा जबरदस्त आवाज हे सगळंच खूप छान जुळून आलं आहे.''

या गाण्याला पाहताच त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मस्त गाणं, चित्रीकरण ही मस्त!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सुंदर गीत, शिकवून घेण्यासारखे खूप आहे, चांगली प्रस्तुती.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सत्य परिस्थिती.'

हेही वाचा : अभिनेत्रीचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरत होता नवरा; CCTV फुटेज पाहून पोलिसांना बसला धक्का

पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं अधिकच रंगत आणली आहे. आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान,  प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शेखर विठ्ठल मते या चित्रपटाचे निर्माते आहेत.