marathi movie

saturday sunday एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा

saturday sunday हा एक रोमांचक अॅक्शन थ्रिलर पार्श्वभुमिवरचा सिनेमा आहे.. एक वेगळीच कथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी या सिनेमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय. एका शासकीय अधिकारीनं रचलेला हा एक जिवघेणा खेळ आहे.

Aug 9, 2014, 12:00 AM IST

सलमान खान आईची इच्छा पूर्ण करणार!

 बॉलिवूड दबंग स्टार आता आपल्या आईची इच्छा पूर्ण कणार आहे. तो 'लय भारी' या मराठी सिनेमात चक्क एक महत्वाची भूमिका करणार आहे. तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. तसे सल्लूकडून सूचित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 5, 2014, 09:59 AM IST

व्हिडिओ :`पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर

समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर बॉईज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल वेबसाईट यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय.

Jun 15, 2014, 03:53 PM IST

प्रचंड प्रेम असल्यामुळे मराठी चित्रपटात काम करणार- अक्षय कुमार

अॅक्शन हिरो अक्षय कुमार मराठी चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. ठण ठण गोपाल या मराठी चित्रपटाच्या मुहुर्तावेळी अक्षय कुमारने ही प्रतिक्रिया दिली आहे.

May 31, 2014, 05:44 PM IST

फिल्म रिव्ह्यू : अ रेनी डे

मराठी सिनेमांचा, संगिताचा बाज तसा प्रेक्षकांच्या ओळखीचाच... त्यातही जरा वेगळ्या धाटणीचा प्रयोग करून पाहावं म्हटलं तर प्रेक्षक सहजासहजी हा प्रयोग स्वीकारतील का? ही सततची धास्ती... पण, हीच धास्ती थोडी बाजुला करून ‘अ रेनी डे’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर हजर झालाय... अर्थात, आपलं वेगळेपण जपून.

Feb 9, 2014, 03:18 PM IST

मराठी चित्रपटात आता कॅब्रे साँग

`हॅलो नंदन` हा चित्रपट पुढच्या महिन्यात रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं वैशिष्टय़ असेल कॅब्रे साँग. आपल्या लेखणीनं महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या गीतकार गुरू ठाकूरनं चित्रपटात हिंदी कॅब्रे साँग लिहलयं. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नृत्यांगना `कॅट`वर या गाण्याचे चित्रिकरण झाले आहे. संगीतकार व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलयं. कॅब्रे साँग हे हिंदी गाणं गायिका नीती मोहन यांनी गायलं आहे.

Feb 7, 2014, 09:46 PM IST

दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!

मराठी सिनेजगतात प्रथमच तीन आठवड्यात ३० कोटींची विक्रमी कमाई करुन `टाइमपास` या सिनेमानं इतिहास रचलाय. एस्सेल व्हिजन निर्मित `टाइमपास` या सिनेमानं मराठी सिनेमांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमी नोंद केली आहे.

Jan 25, 2014, 08:02 AM IST

रिव्ह्यू: ‘मंगलाष्टक वन्स मोअर’- जोडप्यांच्या नेमकं मनातलं सांगणारा

आपल्या सर्वांचे लाडके घना आणि राधाचा ‘मंगलाष्टक वन्स मोअर- एका लग्नाची वेगळी गोष्ट’ हा या शुक्रवारी रिलीज झाला. हा सिनेमा म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येकाला ही कथा आपल्याही घरात घडतेय, अशीच वाटणारी आहे. उत्कृष्ट संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा उत्कृष्ट अभिनय यासर्वांची सांगड आपल्याला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मध्ये बघायला मिळते.

Nov 23, 2013, 02:18 PM IST

`दुनियादारी`ने केला २५ कोटींचा आकडा पार

मराठी चित्रपटांच्या 80 वर्षांच्या इतिहासात 25 कोटींचा आकडा पार करणारा ‘दुनियादारी’ हा पहिलाच सिनेमा ठरलाय.

Oct 3, 2013, 05:26 PM IST

`दुनियादारी`चा विक्रम : ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार

अवघ्या ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार करत `दुनियादारी`नं जोरदार मुसंडी मारलीये. इतक्या कमी दिवसांत ही मजल गाठणारा दुनियादारी हा पहिलाच सिनेमा ठरलाय.

Sep 2, 2013, 06:18 PM IST

रिव्ह्यू- तुमचा `पोपट` व्हनार न्हाय...

शहरातली `प्रेमाची गोष्ट` सांगितल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये. त्यामुळे शहरी प्रेमातून थेट खेडेगावतलं गावरान प्रेम सतीश पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता होतीच. मात्र प्रेमाची ही दुसरी गोष्टही सतीशने यशस्वीपणे पडद्यावर मांडलीये, असं नक्कीच म्हणता येईल.

Aug 25, 2013, 05:18 PM IST

अक्षयकुमार पडला प्रेमात, काढणार मराठी चित्रपट

अभिनेता अक्षयकुमार पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. अहो... म्हणजे मराठी भाषेच्या प्रेमात पडला आहे.

Oct 8, 2012, 06:08 PM IST

'अजिंठा'ला कोर्टाचा ग्रीन सिग्नल

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

May 11, 2012, 01:31 PM IST

नक्षलवादावर मराठी चित्रपट

दहशतवादाच्या समस्येवर हिंदी आणि मराठीसह अन्य भाषांतही चित्रपट आले आहेत. आता नक्षलवादावर 'दलम... जर्नी ऑफ नक्षलबारी' हा मराठी चित्रपट येत आहे.

Jan 14, 2012, 04:05 PM IST