सलमान खान आईची इच्छा पूर्ण करणार!

 बॉलिवूड दबंग स्टार आता आपल्या आईची इच्छा पूर्ण कणार आहे. तो 'लय भारी' या मराठी सिनेमात चक्क एक महत्वाची भूमिका करणार आहे. तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. तसे सल्लूकडून सूचित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated: Jul 5, 2014, 09:55 PM IST
सलमान खान आईची इच्छा पूर्ण करणार! title=

मुंबई : बॉलिवूड दबंग स्टार आता आपल्या आईची इच्छा पूर्ण कणार आहे. तो 'लय भारी' या मराठी सिनेमात चक्क एक महत्वाची भूमिका करणार आहे. तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. तसे सल्लूकडून सूचित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमानची आई सलमा खान यांना मराठी चांगले येते. मराठीच्या प्रेमापोटी त्यांनी सल्लूला गळ घातल्याचे समजते. आपल्या मुलाने मराठी चित्रपटात काम केल्याने आईला आनंद होईल, हे जाणवल्यानेच सलमानने 'लय भारी' चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती अभिनेता रितेश देशमुख यांनेच दिलेय.

'लय भारी' या चित्रपटातून रितेश देशमुख याने मराठी पडद्यावर पदार्पण केलेय. 'लय भारी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेशसह चित्रपटातील इतर कलाकारांनी आणि निर्मात्यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सलमान खान पाहुण्याच्या भूमिकेसाठी आग्रह केल्याचे रितेशने सांगितले.
 
मी मराठी चित्रपटात काम करीत असून, त्याचे चित्रिकरण चालू असल्याचे सलमानला समजले. त्याने माझ्याकडे त्यामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्षात त्यावेळी 'लय भारी'चे चित्रीकरण जवळपास पूर्ण होत आले होते. त्यामुळे त्याला काम कसे द्यायचे, हा प्रश्न होता.

दिग्दर्शक निशिकांत कामत यांना मी सलमानची इच्छा सांगितली. मी ज्या जिममध्ये जात होतो. त्याच जिममध्ये सलमानही येतो. त्यामुळे तो रोज विचारणा करायचा. मग मीदेखील दिग्दर्शकांकडे काय करायचे, याची विचारणा करायचो. पण उत्तर मिळत नसल्याने सल्लूला टाळण्यासाठी मी जिम बंद केली. 

ज्यावेळी कामत यांनी सलमानसाठी एक दृश्य चित्रित करण्याचे ठरवले. त्यांनी मला त्याबद्दल माहिती दिल्यावर मी सलमानला त्याची पाहुणा कलाकार म्हणून भूमिका निश्चित झाल्याचे जिममध्येच सांगितले. मग तो सेटवर आला. त्याला चांगले मराठी समजत असल्याने काही अडचण आली नाही. थोडावेळ सराव केल्यानंचक भूमिका साकारली. सलमान मराठमोळ्या पेहरावात दिसणार असल्याचेही रितेशने सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.