www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी रिलीज होणारा चित्रपट चालत नाही. या अंधश्रद्धेला मोडीत काढत टाइमपास या मराठी चित्रपटाने विक्रमी कमाई केली. वर्षाची सुरूवात इतक्या दणक्यात केल्यानंतर आता नवनवीन प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत होत आहेत.
`हॅलो नंदन` हा चित्रपट पुढच्या महिन्यात रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं वैशिष्टय़ असेल कॅब्रे साँग. आपल्या लेखणीनं महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या गीतकार गुरू ठाकूरनं चित्रपटात हिंदी कॅब्रे साँग लिहलयं. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नृत्यांगना `कॅट`वर या गाण्याचे चित्रिकरण झाले आहे. संगीतकार व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलयं. कॅब्रे साँग हे हिंदी गाणं गायिका नीती मोहन यांनी गायलं आहे.
`हॅलो नंदन` या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल जाधव यानं केलयं. प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न होता. चित्रपटात कॅब्रे नृत्य कथा पुढे नेण्यासाठी वापरण्यात आलं आहे, असं मत राहुल जाधवने व्यक्त केलयं. हेलन, बिंदू यांच्या कॅब्रे इतकं यश हा कॅट`च्या कॅब्रे`ला मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.