IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिजचा चौथा सामना खेळवला जात आहे. 26 डिसेंबर पासून सुरु झालेल्या टेस्ट सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. टीम इंडियाचे दिग्गज आणि अनुभवी फलंदाज भारतासाठो मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले असताना युवा फलंदाजांनी टीम इंडियाची कमान सांभाळली. 22 वर्षीय नितीश कुमार रेड्डी (105) आणि 25 वर्षीय वॉशिंग्टन सुंदर (50) या दोघांनी मेलबर्नमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे भारतावरील फॉलो ऑनचं संकट टळलं तसेच दिवसाअंती ऑस्ट्रेलियाची आघाडी देखील केवळ 116 धावांवर येऊन थांबली.
मेलबर्न टेस्टच्या पाहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स गमावून 474 धावांची खेळी केली. त्यानंतर टीम इंडियासमोर धावांचा डोंगर उभा असताना रोहित शर्मा 5, विराट कोहली 36, ऋषभ पंत 28, रवींद्र जडेजा 17, यशस्वी जयस्वाल 82, वॉशिंग्टन सुंदर 50, तर नितीश कुमार रेड्डीने 105 धावा केल्या. 65 व्या ओव्हरला रवींद्र जडेजाची विकेट पडली तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 221 धावांवर 7 विकेट्स असा होता. मात्र टीम इंडिया संकटात असताना नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंनी मैदानात टिकून राहत जबरदस्त फलंदाजी केली.
नितीश कुमार रेड्डी 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. यावेळी त्याने 83 बॉलमध्ये 51 धावा. तर त्याच्या मागोमाग वॉशिंग्टन सुंदरने देखील 162 बॉलमध्ये 50 धावा करून शतक ठोकले. सुंदर 112 व्या ओव्हरला बाद झाला. मात्र नितीश मैदानात टिकून होता. त्याने 176 बॉलमध्ये नाबाद 105 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. दिवसाअंती टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 358 धावा केल्या. तर नितीश आणि मोहम्मद सिराज हे दोघे नाबाद ठरले. तर ऑस्ट्रेलिया 116 धावांनी अजूनही आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी भारताच्या तीन विकेट्स घेतल्या तर नॅथन लिऑनने 2 विकेट्स घेतल्या.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप