mahavikas aghadi government

संजय राऊत यांचा गंभीर इशारा, फडणवीस आमच्या फंद्यात पडू नका !

Maharashtra Political Crisis : राज्यात राजकीय सत्तानाट्याला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेने थेट भाजपलाच इशारा दिला आहे. (Shiv Sena Crisis) शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे.  

Jun 25, 2022, 11:56 AM IST

मोठी बातमी । राज्यातील राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार !

Maharashtra Political Crisis :  राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार आहे. एकनाथ शिंदे गटाचा निर्णय होईपर्यंत भाजपने सावध पवित्रा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jun 25, 2022, 11:10 AM IST

एकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट, आमचे संरक्षण काढून घेतले; कुटुंबीयांची जबाबदारी सरकारची !

Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

Jun 25, 2022, 10:47 AM IST

Political Crisis :एकनाथ शिंदे यांचा आमदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर

Maharashtra Political Crisis update : एकनाथ शिंदे प्रत्येक आमदाराची रुममध्ये जाऊन वैयक्तिक भेट घेत आहेत.  

Jun 25, 2022, 10:28 AM IST

एकनाथ शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद, काय भूमिका मांडणार?

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गट आज अधिकृत भूमिका मांडणार आहे. मीडियापासून लांब राहणाऱ्या शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होत आहे. 

Jun 25, 2022, 10:08 AM IST

Political Crisis : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांचा खास प्लान, पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

Jun 25, 2022, 09:40 AM IST

मोठी बातमी । राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा

Maharashtra Political Crisis Latest Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Jun 25, 2022, 09:23 AM IST

आताची मोठी बातमी । एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय, शिवसेनेला शह देण्यासाठी रणनिती

Maharashtra Political Crisis Latest Updates:  गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Jun 25, 2022, 09:06 AM IST

उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय !

 Shiv Sena Crisis : शिवसेनेत बंडाचे निषाण फडकविणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे.  

Jun 25, 2022, 08:48 AM IST

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis Latest Updates:  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.  

Jun 25, 2022, 08:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक, पाहा काय ठरलं !

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडीला मोठा वेग आला आहे. बंडखोरांना बाहेरचा रस्ता शिवसेनेने दाखविल्यानंतर आता राजकारणाला मोठी गती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक झाली. 

Jun 25, 2022, 08:06 AM IST

ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा - उद्धव ठाकरे

Shiv Sena Crisis : काही जण म्हणत होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. 

Jun 24, 2022, 03:28 PM IST

बंडखोरी हे भाजपचे कारस्थान, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर घणाघात

CM Uddhav Thackeray's attack on Rebels MLA : तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. 

Jun 24, 2022, 03:12 PM IST

एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, अल्पमतात असलेल्या व्हीपला निलंबनाचा अधिकारच नाही !

Maharashtra Political Crisis : आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव आहे, घाबरवण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. 

Jun 24, 2022, 01:46 PM IST

भाजपचे राज्यापालांना पत्र, 'महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा'

Maharashtra Political Crisis : भाजपने आता वेगळी खेळी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. 

Jun 24, 2022, 12:58 PM IST