एकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट, आमचे संरक्षण काढून घेतले; कुटुंबीयांची जबाबदारी सरकारची !

Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

Updated: Jun 25, 2022, 10:47 AM IST
एकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट, आमचे संरक्षण काढून घेतले; कुटुंबीयांची जबाबदारी सरकारची ! title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांनी घटक  पक्षावर गंभीर आरोप केला आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि करत आहेत, असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आज नोटीस पाठविण्यात येणार आहे. 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढं सुनावणी होण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरु झाल्याचा शिवसेनेने दावा करण्यात आला आहे.