Kabaddi Match Controversey : पंजाबच्या भटिंडा येथे आंतर विद्यापीठ सामन्यादरम्यान तामिळनाडूच्या महिला कबड्डी खेळाडूवर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आल्यानुसार मॅच रेफरीच्या एका निर्णयामुळे खेळाडू नाखुश होते आणि त्यानंतर हे भांडण सुरु झाले. मिळालेल्या माहितीनुसार मदार तेरेसा विद्यापीठ, पेरियार विद्यापीठ, अलगप्पा विद्यापीठ आणि भरथियार विद्यापीठातील महिला खेळाडू उत्तर विभागीय आंतर-विद्यापीठ आणि अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कबड्डी (महिला) 2024-25 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पंजाबमध्ये आल्या होत्या.
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार मदर तेरेसा विद्यापीठाच्या महिला खेळाडूंवर विरुद्ध संघाच्या खेळाडूने हल्ला केला. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार दरभंगा विद्यापीठात विरुद्ध मदर तेरेसा विद्यापीठ यांच्यातील सामन्यादरम्यान मदर टेरेसा विद्यापीठाविरुद्ध 'फाउल अटैक' या कारणावरून वाद झाला. कबड्डी सामन्यातील रेफरीने मदर तेरेसा संघाच्या एका खेळाडूवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये खेळाडू काही लोकांशी भिडताना दिसतायत, पण व्हिडीओ पाहून स्पष्ट होत नाही की राड्यात फक्त खेळाडूंचा समावेश होता की काही प्रेक्षक देखील सहभागी झाले होते. दोन्ही संघांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकल्या गेल्या.
सध्या व्हायरल व्हिडिओमध्ये दरभंगा विद्यापीठ संघाच्या समर्थनार्थ काही प्रेक्षकही या राड्यात सामील झालेले दिसले. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एकमेकांवर खुर्च्या फेकल्या जात आहेत तसेच तामिळनाडूच्या खेळाडूंवर हल्ला होत असल्याचे स्पष्ट दिसते. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हल्ल्याला दुजोरा दिला असून अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्यात खेळाडूंना गंभीर दुखापत झाली नसून त्यांना किरकोळ ओरखरडे आल्याची माहिती उदयनिधी स्टॅलिन यांनी दिली आहे.
It is shocking that Tamil Nadu women players who went to play Kabaddi in Punjab were attacked. The attack took place during a Kabadi match between Punjab and Tamil Nadu. I urge the Punjab Chief Minister Bhagwant Mann ji to take appropriate enquiry and action on attackers.… pic.twitter.com/vIZrG0EsVn
— Devakumaar (DevakumaarOffcl) January 24, 2025
हेही वाचा : 20 वर्षांच्या सुखी संसाराला लागली नजर! Love मॅरेज करणारा सेहवाग घेणार घटस्फोट
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हल्ल्याचा निषेध केला तसेच सर्व महिला खेळाडू या सुरक्षित असून त्या लवकरच राज्यात परततील असे देखील म्हटले. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, "आम्हाला तक्रार मिळताच आम्ही प्रशिक्षकाला बोलावले. SDAT (तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरण) ने खेळाडूंना सुरक्षा देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सुविधांची काळजी घेण्यासाठी आम्ही भौतिक संचालक आणि प्रशिक्षक पाठवतो, दुर्दैवाने अशी घटना घडली. भटिंडा येथून खेळाडू दिल्लीला रवाना झाले असून ते दिल्ली हाऊसमध्ये राहतील आणि तामिळनाडूला परततील".