मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
Jun 22, 2012, 02:36 PM ISTअग्नितांडवाचे पाच बळी
मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.
Jun 22, 2012, 01:34 PM ISTमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर
मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Jun 22, 2012, 11:55 AM ISTअजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
Jun 22, 2012, 10:37 AM ISTमंत्रालयातील आगीतील जखमींची नावे
www.24taas.com,मुंबई
मंत्रालयातील आगीतील जखमींची नावे |
अशोक पिसाट - समन्वयक, जलसंपदा |
किशोर रमेश गांगुर्डे – जनसंपर्क अधिकारी, गृह मंत्रालय - उजव्या गुडघ्याला मार |
सतीश लळीत – जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री |
हेमंत खैरे |
अविनाश सुर्वे
| श्रीधर सुर्वे
Jun 22, 2012, 07:22 AM ISTमंत्रालयाचा विमाच नाही!
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jun 22, 2012, 07:22 AM ISTमंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू
मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
Jun 21, 2012, 10:56 PM ISTमंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी
मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.
Jun 21, 2012, 06:40 PM ISTLIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...
मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.
Jun 21, 2012, 06:40 PM IST'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?
महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
Jun 21, 2012, 06:38 PM ISTधुराचाही येतोय वास...
मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...
Jun 21, 2012, 05:02 PM ISTनाशकात मॉलला आग, एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळ साखला शॉपिंग मॉलला लागलेली भीषण आग विझवण्य़ात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू झालाय. तर शॉपिंग मॉलचं कोट्यवधींचं नुकसान झाले आहे.
May 2, 2012, 09:23 AM ISTमानखुर्द येथे भंगार गोदामाला आग
मानखुर्द येथे आज शुक्रवारी सकाळी भंगाराच्या गोदामाला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दल नियंत्रण कक्षाने सांगितले. दरम्यान, शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
Mar 30, 2012, 10:48 AM ISTकुर्ल्यात कपड्याच्या गोदामाला आग
मुंबईतल्या कुर्ला परिसरात काल रात्री आग लागल्याची घटना घडलीय. कुर्ला फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या एका चामड्याच्या आणि कपड्याच्या गोदामाला रात्री साडेअकराच्या सुमारास ही आग लागली. नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.
Mar 19, 2012, 10:14 AM ISTपुण्यात पुठ्ठ्याचा कारखाना आगीत खाक
पुण्यातल्या जुन्या बाजारात पुठ्ठ्याच्या कारखान्याला भीषण आग आगली. त्यामुळं आसपासची १५ ते २० दुकानं आणि झोपड्या भस्मसात झाल्या.
Feb 22, 2012, 01:03 PM IST