ताडदेवमध्ये इमारतीला भीषण आग, २० जण अडकले
मुंबईतील ताडदेव भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. बस डेपोसमोरील एव्हरेस्ट टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे.
Aug 9, 2012, 05:58 PM ISTसरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
Jul 9, 2012, 10:05 PM ISTमंत्रालयाची आग घातपात नाही- फॉरेंन्सिक लॅब
मंत्रालयाला लागलेली आग हा एक घातपात नसून निव्वळ अपघात असल्याचा निष्कर्ष मुंबईतील फोरेंनसिक लॅबने काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रालयाच्या इमारतीला आग लावल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
Jul 1, 2012, 03:45 PM ISTमुखर्जींची बैठक संपताच सभागृहाला आग
युपीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांची बैठक संपताच जुबली सभागृहाच्या गच्चीला आग लागल्याची घटना आज येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
Jul 1, 2012, 03:44 PM ISTमंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!
भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2012, 04:04 PM ISTकोकण भवनची सुरक्षा रामभरोसे
नवी मुंबईत सिडको भवनसमोरच असलेली कोकण भवनची इमारत हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. या अत्यंत महत्वाच्या इमारतीमध्येही आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावी नाहीत. अग्निशामक उपकरणे बसवण्यात आली असली तरी प्रत्येक मजल्यावर वीज वायरींचं जाळं विस्कळीत आहे. सहाव्या मजल्यावर तर पॅसेजमध्ये दोन्ही बाजूंनी लाकडी समान आणि कागदांचे गठ्ठे आहेत. या स्थितीचा घेतलेला हा आढावा.
Jun 24, 2012, 07:09 PM ISTमुंबईत ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी
मुंबईतील मंत्रालयातली आग विझवतांना पाण्याची कमतरता स्पष्टपणे जाणवत होती. कारण मुंबईतील ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी झाले आहेत.
Jun 24, 2012, 02:54 PM ISTमंत्रालय आगीचे होणार 'सेफ्टी ऑडीट'
मुंबई आणि राज्यातल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींचे पुढील तीन महिन्यांत फायर सेफ्टी ऑडीट करण्याच्या सूचना नगरविकास विभागानं दिल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या सर्व इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक असणार आहे.
Jun 24, 2012, 01:41 PM ISTसलमानच्या शुटींगमध्ये लागली स्टुडिओला आग
मुंबईतील मेहबूब स्टुडिओला आग लागली आहे. सलमान खानच्या दबंग २ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ही आग लागली होती. ही आग शॉर्ट सक्रीटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
Jun 23, 2012, 11:37 PM ISTआग लागली तरी आम्ही तिथेच बसू...
आगीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयाला झळ पोहचली. मात्र लोकांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यायी जागेतून कारभार न करता मंत्रालयात बसूनच काम पाहणार आहेत.
Jun 23, 2012, 09:38 PM IST‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.
Jun 23, 2012, 08:15 AM ISTआगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...
मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.
Jun 22, 2012, 07:31 PM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM IST