fire

`तेजाब`चे फायनान्सर दिनेश गांधी यांचा होरपळून मृत्यू!

मुंबईच्या कॅम्प्स कॉर्नर भागातील आलिशान २६ मजली टॉवरला लागलेल्या आगीत सात लोकांचा बळी गेलाय तर सात जखमी झालेत. चित्रपट निर्माते दिनेश गांधी यांचा या आगीत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Dec 15, 2013, 12:21 PM IST

बस ड्रायव्हरच्या प्रसंगावधामुळं चिमुकल्यांचे प्राण वाचले

अंधेरीमध्ये आज मोठा अपघात होता होता वाचला. मिल्लत शाळेची बस जोगेश्वरीकडून अंधेरीकडे जात होती. सीएनजीवर चालणाऱ्या या बसमध्ये स्पार्किंग झालं.

Dec 14, 2013, 04:27 PM IST

मुंबईत २६ मजली इमारतीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईत केम्प्स कॉर्नर येथील माउंट प्लांट या २६ मजली इमारतीला आग लागली. या आगीत सहा रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे.

Dec 14, 2013, 06:47 AM IST

माऊंट प्लांट निवासी इमारतीला आग, ६ जवान जखमी

दक्षिण मुंबईतल्या एका निवासी इमारतीला रात्री साडेसाच्या सुमारास आग लागलीये. बाराव्या मजल्यावरी बन्सल यांच्या घरात इंटेरिअरचं काम सुरु होतं. तिथं अचानक आग लागली.

Dec 14, 2013, 12:00 AM IST

मेणबत्तीच्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही

औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागात मेणबत्तीच्या गोडाऊनला भीषण आग लागलीय. या आगीत जवळजवळ तीन कोटींचं नुकसान झालंय.

Dec 12, 2013, 06:32 PM IST

पुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू

पुण्यातल्या अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहनं जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना आहे.

Nov 23, 2013, 09:15 AM IST

शाहरुख खानच्या `मन्नत`मधील आग आटोक्यात

गुरूवारचा दिवस अग्नितांडवाचाच दिवस ठरलाय... बॅक बे आगार जवळील आंबेडकरनगर झोपडपट्टी, एल अँड टीचं इमर्जन्सी प्लांट सोबतच किंग खान शाहरुखच्या `मन्नत` या बंगल्यात ही आग लागली. लवकरच ही आग आटोक्यात आली. त्यामुळं सुदैवानं आगीत कोणालाही हानी झालेली नाही.

Nov 22, 2013, 08:57 AM IST

मुंबईतल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईतल्या बॅक बे आगाराच्या मागे असलेल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Nov 21, 2013, 12:56 PM IST

`राम-लीला` प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहात जाळपोळ

कडेकोट पोलीस सुरक्षेचा दाव्याला फोल ठरवत सोमवारी काही जणांनी ‘राम-लीला’ हा सिनेमा सुरू असलेल्या सिनेमाघरांत तोडफोड केली.

Nov 19, 2013, 10:09 PM IST

पुण्यातील मॉडर्न कॅफेला आग

पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या मॉडर्न कॅफेला सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमधल्या भटार खाण्यात आग लागली होती. आगीत हॉटेलचं नुकसान झालंय मात्र, कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Nov 7, 2013, 04:26 PM IST

मंत्रालयातल्या आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या?

नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे चिंतेत टाकलंय. २१ जून २०१३ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगित मंत्रालयातील अनेक महत्वाच्या फाईली जळून खाक झाल्या होत्या.

Nov 6, 2013, 02:47 PM IST

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनवर गोळीबार

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनमध्ये आज सकाळी गोळीबार झाला. महिला डब्यात लपून बसलेल्या दोघांनी हा गोळाबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

Oct 25, 2013, 11:06 AM IST

मुंबईत स्कूल व्हॅनला आग, चालक फरार

विलेपार्ले इथे आज एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागल्यामुळे ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला. मात्र गाडीतल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आलं.

Oct 17, 2013, 04:44 PM IST

वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक

मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.

Oct 17, 2013, 04:11 PM IST

राजधानी एक्सप्रेसला भीषण आग

आसाममधल्या दिब्रुगडमध्ये राजधानी एक्स्प्रेसला आग लागली होती. पेन्ट्री कारला ही आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. आता जळालेला पेन्ट्री कारचा डबा एक्स्प्रेसपासून वेगळा करण्यात आलाय.

Oct 15, 2013, 12:52 PM IST