मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Updated: Jun 22, 2012, 11:55 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर आज मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. गुरुवारी रात्रीच मुख्यमंत्र्यांनी या आगीचे सीबीआय  चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तातडीनं क्राईम  ब्रान्च घटनास्थळी दाखल झाली होती. मंत्रालयाला लागलेल्या आगीची क्राईम  ब्रान्चनं आज सकाळपासून चौकशी सुरू केलीय. रात्रभर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपासासाठी सीबीआय जखमी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेणार आहे. तसंच याकामी फायर ब्रिग्रेडची घेणार मदत घेण्यात येणार आहे. क्राईम ब्रान्च फॉरेन्सिक पुरावे करणार सादर करणार आहे.

 

तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवर प्रशासन विधान भवन, नवीन प्रशासकीय इमारत आणि सह्याद्री या अतिथीगृहातून सुरू राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयातील आग आटोक्यात आलीय. मंत्रालयात नेमकी आग कशामुळे लागली याबाबत क्राईम ब्रान्च आणि अग्निशमन दलाकडून चौकशी करण्यात येणार, असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

दरम्यान, आगीमध्ये जखमी झालेल्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जे. जे. हॉस्पिटलमध्ये ११ जणांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय गुदमरलेल्या सात जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या आगीत वरच्या मजल्यावर अडकलेल्या ६५ कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात यश आलंय.

 

काय जळालं काय वाचलं...

या आगीत चौथ्या मजल्यावर - नगरविकास, आदिवासी विकास, शालेय शिक्षण, वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक विकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास

पाचव्या मजल्यावर – आपत्कालीन कक्ष, मुख्य सचवांचे कार्यालय, समिती कक्ष

सहाव्या मजल्यावर – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांचं कार्यालय

सातव्या मजल्यावर – आयटी विभाग, संपर्क यंत्रणा, मुख्य टॉवर

या सर्व खात्यांची कार्यालय आणि तिथं ठेवलेल्या फाईल्स जळून खाक झाल्या आहेत. यूएलसी घोटाळ्यासंबंधित फाईल्सचाही त्यात समावेश आहे. मात्र आदर्श घोटाळ्यासंबंधित सर्व फाईल्स सीबीआयकडे सुरक्षित असल्याचं सांगतिलं गेलंय.

 

.