fire

कपिलचा उत्साह कायम; प्रेक्षकांचे मानले आभार

‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’चा होस्ट कपिल शर्मा यानं चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानलेत. आपण हा शो घेऊन लवकरच परतणार आणि लोकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करणार असा विश्वास कपिलनं व्यक्त केलाय.

Sep 26, 2013, 01:14 PM IST

आगीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`चा सेट जळून खाक

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आज सकाळी आग लागली होती. या आगीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`चा संपूर्ण सेट जळून खाक झालाय.

Sep 25, 2013, 03:05 PM IST

फिल्मसिटीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला आग

मुंबईतल्या दादासाहेळ फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीतल्या एका सेटला आज सकाळी आग लागली. ही आग प्रसिद्ध कॉमेडी शो असलेल्या `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला लागल्याचं कळतंय.

Sep 25, 2013, 10:41 AM IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार, राजेश कदमांना अटक

गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार करणारे बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम यांना अटक करण्यात आली. सचिन देसाई आणि प्रताप कनोडिया या दोघा कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे.

Sep 20, 2013, 09:09 AM IST

दादर फुलमार्केटजवळील गोदामाला आग

गणेशोत्सवामुळं गर्दीनं फुलून गेलेल्या दादरच्या फुलबाजारात आज सकाळी तयार कपड्याच्या गोदामाला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहाय्यानं, दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं, या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

Sep 11, 2013, 11:57 AM IST

बौद्धांनी जाळली मुस्लिम धर्मियांची घरं

धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत.

Aug 25, 2013, 03:37 PM IST

नागपूरमध्ये गोळीबार, एक गंभीर

नागपूरमधल्या फ्रेंड्स कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Jul 23, 2013, 10:37 AM IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली

नवी मुंबई महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते आणि पालिका शिक्षण उप सभापती विवेक सिंग यांची गाडी अज्ञात इसमांनी बुधवारी रात्री जाळली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.

Jun 6, 2013, 09:00 PM IST

सिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर!

नागपूरच्या फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड परिसरातल्या सिंडीकेट बँकेत आज सकाळी आग लागली होती. आगीचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जातेय.

Jun 3, 2013, 06:06 PM IST

नवी मुंबईत बिल्डर बिजलानीवर गोळीबार

बिल्डर सुनीलकुमार लाहोरिया हत्या प्रकरणातील आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी याची खारघरमध्ये कार अडवून मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकर्यांचनी त्यांच्यावर गोळीबार केला. खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील ग्रामविकास भवनसमोर शुक्रवारी भर दुपारी ही घटना घडली.

May 25, 2013, 09:21 AM IST

केमस्टार कंपनीला भीषण आग , एकाचा मृत्यू

डोंबिवली MIDC परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागलीय. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत.

May 13, 2013, 09:35 AM IST

मुंबईतल्या इन्कम टॅक्स ऑफिसची आग आटोक्यात

मुंबईतल्या नरिमन पॉईंटजवळच्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या इमारतीला रात्री आग लागली. इन्कमटॅक्स ऑफिसच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली.

May 10, 2013, 10:00 AM IST

पुणेकरांनो सावधान... बंद घरात कधीही लागेल आग!

उन्हाळ्याच्या सुटी मध्ये बाहेर जाताय आणि त्यामुळे तुमचं घर काही दिवसांसाठी बंद राहणार आहे, तर पुणेकरांनो सावधान... कारण तुमच्या बंद घरात कधीही आग लागू शकते. पुण्यात सध्या दररोज असे तीन ते चार प्रकार घडतायत.

May 2, 2013, 06:13 PM IST

आकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून

दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.

Apr 12, 2013, 02:24 PM IST

मुंबईतील वांद्रे येथे आगीत १५० झोपड्या खाक

वांद्रे भागातील शास्त्रीनगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत १५० झोपड्या जळून खाक झाल्यात तर १५ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी तैनात पोहोचल्या. मात्र, आग पहाटे आटोक्यात आणण्यात यश आले.

Mar 7, 2013, 11:51 AM IST