corona virus

साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Apr 7, 2023, 02:21 PM IST

Corona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. 

Apr 6, 2023, 08:19 PM IST

Corona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. कोरोनाचा वाढता धोका पाहता साताऱ्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातही मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. 

Apr 4, 2023, 10:21 PM IST

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...

Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे. 

Apr 4, 2023, 07:16 PM IST

तो पुन्हा आलाय! अभिनेत्री माही विज, राज कुंद्राला कोरोनाची लागण

Celebs Infected From Corona Virus: कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यात 2 आठवड्यापूर्वी नियंत्रणात असलेल्या रुग्णात वाढ झाली आहे. परिणामी मनोरंजन क्षेत्रात ही रुग्ण संख्येत वाढताना दिसते. 

Mar 30, 2023, 04:14 PM IST

Corona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

Mar 29, 2023, 10:30 PM IST

Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय... 

Mar 29, 2023, 07:25 PM IST

Corona Return : नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट? वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवं संकट

कोरोना गेलाय या भ्रमात राहू नका. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय झालाय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगान पसरत असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय, गेल्या काही दिवसात देशात हजाराहून अधिका कोरोना रुग्ण आढळून आलेत.

Mar 23, 2023, 07:54 PM IST

Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन

Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.

Mar 20, 2023, 05:33 PM IST

Corona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mar 20, 2023, 01:57 PM IST

Influenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले

H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

Mar 16, 2023, 08:37 PM IST

H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक

H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक

Mar 13, 2023, 09:50 PM IST