VIDEO : अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, देवी-देवतांच्या मुर्तीसह 'या' गोष्टींवर खिळली नजर

Anant Ambani and Radhika Merchant Wedding Card : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडीओ आला समोर...

दिक्षा पाटील | Updated: Jun 27, 2024, 11:37 AM IST
VIDEO : अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, देवी-देवतांच्या मुर्तीसह 'या' गोष्टींवर खिळली नजर title=
(Photo Credit : Social Media)

Anant Ambani and Radhika Merchant Wedding Card : बिझेसमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीन घाई सुरु झाली आहे. आता काही दिवस बाकी आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचा मुलगी अनंत अंबानी हा 12 जुलै रोजी राधिका मर्चेंटशी लग्न करणार आहे. 12 जुलै रोजी मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये ते दोघं सप्तपदी घेणार आहेत. त्यांचं लग्न हे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला झालेले त्यांचे प्री-वेडिंग पार्टी... आता त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा रंगली आहे. 

नीता अंबानी यांनी काशीच्या बाबा विश्वनाथ यांच्या चरणी मुलाच्या लग्नाची पहिली पत्रिका ठेवली आहे. ज्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना आणि पाहुण्यांना आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. अजय देवगणनंतर आता अनंत हा अक्षय कुमारच्या घरी पोहोचला आणि त्यानं चांदीचं मंदिर असलेली लग्नाची पत्रिका खिलाडी कुमारला दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या वेडिंग कार्डचे व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात भगवान शिव, गणेश आणि श्रीरामांची मूर्ती आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाचं आयोजन 12 जुलै रोजी सुरु होणार आणि 14 रोजी हा शाही विवाहसोहळा संपेल. या कार्यक्रमात देशातील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतील. अनंत स्वत: त्याच्या लग्नाची पत्रिका वाटताना दिसतोय. सुरुवातीला तो अजय देवगण घरी पोहोचला आणि त्यानंतर अक्षय कुमारच्या घरी गेला. सोशल मीडियावर अनंक आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होतेय, ही अगदी हटके अशी पत्रिका आहे. यात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आणि फ्रेम आहेत. बॉक्स उघडताच बॅकग्राऊंडला हिंदी मंत्र ऐकायला येतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्ट

दरम्यान, असं म्हटलं जातं की पहिल्या दिवशी लग्नाची सेरेमनी असेल. ज्यात सगळ्यांना भारतीय पोशाख परिधान करण्यास सांगितले आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जुलै रोजी आशीर्वाद सेरेमनी होईल, ज्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी इंडियन फॉर्मल ड्रेस परिधान करावे लागतील. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी लग्नाची रिसेप्शन आणि मंगल उत्सव असेल. तर या कार्यक्रमासाठी इंडियन चिक ड्रेस कोड आहे. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत.