खबरदारी घेण्याचं आवाहन

कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचं सांगण्यात आलंय. नवा व्हेरिएंट इम्युनिटीवरही भारी पडत असल्याने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mar 20,2023

रुग्ण वाढण्यामागे नवा सब व्हेरिएंट

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या काही दिवसात भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असून यामागे कोविड-19 XBB व्हेरिएंटचा XBB 1.16 सब व्हेरिएंट कारणीभूत आहे.

नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण

केंद्रीय आरोग्य विभागने दिलेल्या माहितीनुसार भारतात 48, सिंगापूरमध्ये 14 तर अमेरिकेत 15 प्रकरण XBB 1.16 व्हेरिएंटची आढळली आहेत.

सक्रिय रुग्णसंख्या वाढतेय

देशात सध्या कोरोनाचे 5915 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात ज्या महाराष्ट, राजस्थान आणि केरळात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य विभाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी 1 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात 1071 रुग्णांची नोंद झाली असून 3 जणांचा मृत्यू झालाय.

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

देशात H3N2 इनफ्ल्यूंजाचे रुग्ण वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याचं दिसतंय. केंद्रीय आरोग्य विभागने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 129 दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story