फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतात

अनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 26, 2024, 04:20 PM IST
फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतात title=

आता उन्हाळा असो किंवा पावसाळा.. अगदी थंडीतही लोकं आवडीने आईस्क्रिम खाताना दिसतात. पण अनेकदा आईस्क्रिम अगदी फ्रिजरमध्ये ठेवूनही ते डब्यात विरघळतं असं का होतं? असा अनेकांचा प्रश्न असतो. 

आईस्क्रिम प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे अनेकांच्या घरी अगदी 12 महिने आईस्क्रिम असते.  पण जेव्हा आइस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतरही ते खराब होते तेव्हा समस्या उद्भवते. मग त्याच्या चवीसोबतच मूडही बिघडतो, त्यामुळे आईस्क्रीम साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तुमची छोटीशी चूकही आईस्क्रीम वितळण्यास कारणीभूत ठरू शकते.

आईस्क्रिम कुठे ठेवाल 

आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवताना ते कधीही दाराजवळ ठेवता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. कारण फ्रीझरच्या आतील तापमानाच्या तुलनेत दरवाजाजवळचे तापमान वेगळे असते, ज्यामुळे आइस्क्रीम वितळते. याशिवाय आइस्क्रीमसोबत खाद्यपदार्थांचा वास कधीही ठेवू नका. त्यामुळे आइस्क्रीमची चवच खराब होत नाही तर वासावरही परिणाम होतो.

टेम्प्रेचर महत्त्वाचे 

बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये बर्फ जमा होतो पण आइस्क्रीम नाही. तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आइस्क्रीम गोठवण्यासाठी किमान -12 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. जरी सर्वोत्तम तापमान -18 अंश सेल्सिअस मानले जाते. तर ० अंश सेल्सिअसवर पाणी गोठण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत कंप्रेसर पूर्ण क्षमतेने काम करत नसला तरी बर्फ गोठतो पण आईस्क्रीम वितळेल. म्हणून, कंप्रेसर दुरुस्त करणे आवश्यक आहे, आणि आपण आइस्क्रीम गोठवण्यासाठी त्यानुसार तापमान देखील सेट केले पाहिजे.

झाकणामुळे जमा होतो बर्फ 

जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये आइस्क्रीम ठेवता तेव्हा त्याचे झाकण व्यवस्थित ठेवावे. झाकण नीट न लावल्यास आइस्क्रीम हवेच्या संपर्कात येते, त्यामुळे ते वितळण्याचा धोका वाढतो. काही वेळा फ्रीझर खूप रिकामा असल्यानेही फरक पडतो कारण फ्रीजरमध्ये सामान असल्याने थंड हवा तिथे अडकते आणि आईस्क्रीम गोठून राहते. अनेकदा फ्रीजमध्ये थंड हवा येणारा एअर वेंट ठिक काम करत नाही. ज्यामुळे एअर फ्रिजरमध्ये चांगली पोहोचत नाही. यामुळे थंड फ्रिज न राहता आईस्क्रिम वितळतो.