bangladesh

भारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.

Apr 5, 2015, 03:07 PM IST

बांगलादेश जिंकणार पुढचा वर्ल्ड कप!

बांगलादेशची टीम यंदाच्या वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे, मात्र पुढचा वर्ल्ड कप बांगलादेशच जिंकणार असल्याची भविष्यावाणी बांगलादेशचे खेळ मंत्री बिरेन सिंकदर यांनी केली आहे. 

Mar 23, 2015, 05:14 PM IST

बांग्लादेश कर्णधार मशरेफी मुर्तजावर निलंबनाची कारवाई

बांग्लादेशचा कर्णधार मशरेफी मुर्तजाला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल  एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच सामन्याच्या एकूण मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

Mar 20, 2015, 02:33 PM IST

वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत - आयसीसी अध्यक्ष

टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.

Mar 20, 2015, 12:13 PM IST

विराटची विकेट घेतल्यानंतर गेला रुबेलचा तोल!

 भारताचा धुरंधर क्रिकेटर क्रिकेटर विराट कोहली आज बांग्लादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केवळ तीन रन्सवर आऊट झाला. विराटला आऊट केल्यानंतर बांग्लादेशी बॉलर रुबेल हुसैन यानं मात्र जोशमध्ये येऊन खुन्नसमध्ये विराटसाठी अपशब्द वापरले. त्यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. 

Mar 19, 2015, 02:16 PM IST

आज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!

मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.

Mar 19, 2015, 12:49 PM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs बांग्लादेश (दुसरी क्वॉर्टर फायनल)

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरी  क्वार्टर फाइनल होत आहे. भारतासाठी ही लढत सोपी वाटत असली तरी सोपी नाही. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. 

Mar 19, 2015, 08:17 AM IST

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'चा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर भारत-बांग्लादेश सामन्यादरम्यान रिलीज करण्यात येणार आहे. कारण भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ मार्च रोजी हा सामना रंगणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात रणबीर कपूर स्वत: हा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

Mar 18, 2015, 09:08 PM IST

VIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!

'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...

Mar 18, 2015, 01:59 PM IST

भारताविरुद्ध जिंकण्याबाबत बांग्लादेशच्या शाकिबचे हे उत्तर !

सध्या भलताच फॉर्मात असणारा बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब उल हसन यांने भारताविरुद्ध क्वार्टन फायनलबाबत छेडलेल असताना सावध उत्तर दिले. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळाणाऱ्या संघाबाबत २००७मधील पुनरावृत्ती होईल का?, असा थेट सवाल विचारण्यात आला.

Mar 18, 2015, 11:31 AM IST

'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'

बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'

Mar 17, 2015, 09:29 AM IST

'बांग्लादेशला कमी समजण्याची चूक भारत करणार नाही'

भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताचा क्वार्टर फायनलमधील सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. मात्र, बांग्लादेश विरुद्धचा  हा सामना सोपा नाही. सध्या, बांग्लादेश ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामळे भारतासाठी ही टीम धोकादायक ठरू शकते, असं मत भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलंय.  

Mar 14, 2015, 12:23 PM IST

१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल

वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.

Mar 13, 2015, 05:15 PM IST

महमदुल्लाहनं तोडला स्वत:चाच रेकॉर्ड...

वर्ल्डकप क्रिकेटमध्ये आज बांग्लादेशच्या महमदुल्लानं आज आपलाच रेकॉर्ड तोडलाय. महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी खेळलीय. यामुळे, तो वर्ल्डकप क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकणारा बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरलाय. 

Mar 13, 2015, 11:12 AM IST