ऑकलंड : भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताचा क्वार्टर फायनलमधील सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. मात्र, बांग्लादेश विरुद्धचा हा सामना सोपा नाही. सध्या, बांग्लादेश ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामळे भारतासाठी ही टीम धोकादायक ठरू शकते, असं मत भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलंय.
भारत 'ग्रुप ए'मध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि बांग्लादेश 'ग्रुप बी'मध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये त्यांचा सामना जवळजवळ निश्चित झालाय. जर नशिबाने साथ दिली तर बांग्लादेश कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, असं गावस्कर यांनी म्हटलंय.
'बांग्लादेशने वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला पराभूत केले आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश पराभूत झाला असला तरी तो सामनाही अटीतटीचा होता. बांग्लादेशचा फॉर्म पाहता तो भारताला धोकादायक ठरू शकतो' असं गावास्कर यांना वाटतंय.
विनिंग टीममध्ये कोणतेही बदल न करण्याच्या धोनीच्या निर्णयाचंही गावस्कर यांनी स्वागत केलंय.