भारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.

Updated: Apr 5, 2015, 03:07 PM IST
भारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका title=

नवी दिल्ली: येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.

आदनमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असल्यामुळं या युद्ध नौकेला अदान बंदरापासून दूर थांबवण्यात आलं. त्यानंतर काही लहान होड्यांच्या मदतीनं शहरात अडकलेल्या भारतीय नागरीकांना जहाजात आणण्यात आलं. 

सध्या या भागात सौदी अरेबियातील दहशतवादी  संघटनांनी ताबा घेतला असून या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळं या भागात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश ही नौदलाची जहाजं पाठवण्यात आलीत.

(एजंसी इनपुटसह)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.