महमदुल्लाहनं तोडला स्वत:चाच रेकॉर्ड...

वर्ल्डकप क्रिकेटमध्ये आज बांग्लादेशच्या महमदुल्लानं आज आपलाच रेकॉर्ड तोडलाय. महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी खेळलीय. यामुळे, तो वर्ल्डकप क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकणारा बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरलाय. 

Updated: Mar 13, 2015, 11:12 AM IST
महमदुल्लाहनं तोडला स्वत:चाच रेकॉर्ड... title=

हेमिल्टन : वर्ल्डकप क्रिकेटमध्ये आज बांग्लादेशच्या महमदुल्लानं आज आपलाच रेकॉर्ड तोडलाय. महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी खेळलीय. यामुळे, तो वर्ल्डकप क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकणारा बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरलाय. 

महमदुल्लाहच्या या ऐतिहासिक खेळाच्या जोरावर बांग्लादेशनं ५० ओव्हर्समध्ये ७ विकेट गमावत न्यूझीलंडसमोर २८८ रन्स उभारलेत. 

महमदुल्लाहनं या अगोदर झालेल्या मॅचमध्येही शतक ठोकून इतिहास रचला होता. वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा तो बांग्लादेशनचा पहिलाच खेळाडू ठरला होता.   
 
'वन डे क्रिकेट'मध्ये असा रेकॉर्ड करणारा शहरयार नफीसनंतर मोहमदुल्लाह दुसरा खेळाडू ठरलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.