मेलबर्न : टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.
बांग्लादेशला भारताविरूद्ध क्वार्टर फायनलमध्ये दारूण पराभव पत्करावा लागला. मॅचदरम्यान पंच कामगिरीविरोधात बांग्लादेश क्रिकेट बोर्डने नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीकडे याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय बांग्लादेश क्रिकेट बोर्डने घेतला आहे.
भारताने बांग्लादेशला १०९ रन्सने पराभूत केलं. या मॅचमध्ये रोहित शर्मा कॅच आऊट झाल्यावर तो बॉल 'नो बॉल' असल्याचा निर्णय पंचाने दिला. त्यावेळी रोहित शर्मा ९० रन्सवर खेळत होता आणि भारताचा स्कोर १९६ होता. या संशयास्पद नो बॉलचा फायदा रोहित शर्माला मिळाला. त्यानंतर रोहित शर्माच्या ४७ रन्सच्या मदतीने भारताने ३०० रन्सचा टप्पा पार केला.
इयान गाउल्ड या पंचाने नो बॉलचा निर्णय दिला होता. याविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय बांग्लादेश क्रिकेट बोर्डने घेतला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही आयसीसीकडे तक्रार करणार आहोत. यामुळे निर्णय बदलणार नसेल तरी या चुकीच्या निर्णयाचा फटका आमच्या टीमला बसला आहे, असे मत बांग्लादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी व्यक्त केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.