मेलबर्न : सध्या भलताच फॉर्मात असणारा बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब उल हसन यांने भारताविरुद्ध क्वार्टन फायनलबाबत छेडलेल असताना सावध उत्तर दिले. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळाणाऱ्या संघाबाबत २००७मधील पुनरावृत्ती होईल का?, असा थेट सवाल विचारण्यात आला.
शाकिब यांने दोन ते तीनवेळा उत्तर देण्याचे टाळले होते. मात्र, पुन्हा पुन्हा पत्र उपस्थित केल्यानंतर शाकिब म्हणाला, आताच काही सांगता येणार नाही. ५० टक्के शक्यता आहे का, बांग्लादेश जिंकेल का? भारताविरुद्ध विजय शक्य आहे का?, असा थेट सवाल आल्यानंतर सावध भूमिका घेत उत्तर दिले. मला माहित नाही. त्या दिवशीच्या खेळावर सर्व काही अबलंबून आहे.
आम्ही चांगली सुरुवात केली तर निश्चित लक्ष्य गाठू शकतो. बांग्लादेश संघ कागदावर चांगला आहे. तसेच भारतही आहे. त्यामुळे आताच सांगणे अवघड आहे. ही एका दिवसाची बाब आहे. आम्हाला चांगले प्रदर्शन करावयास हवे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.