काँग्रेस आघाडीबाबत राष्ट्रवादीची सारवासारव

 स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली. २८८ जागांच्या मुलाखती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीनं केलीये. पुढल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

Updated: Sep 20, 2014, 10:07 PM IST
काँग्रेस आघाडीबाबत राष्ट्रवादीची सारवासारव  title=

मुंबई : स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली. २८८ जागांच्या मुलाखती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीनं केलीये. पुढल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीनं सर्व मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळं आता काँग्रेसनंही आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रसही आता २८८ जागांसाठी तयारी सुरू करणार आहे. यापूर्वीच काँग्रेसनं १७४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता उर्वरित ११४ जागांसाठी ३१ ऑगस्टपासून काँग्रेसकडून चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी मवाळ झाली असली, तरी आघाडीतला जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे... 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नसतानाच नागपूर शहरात असलेल्या ६ विधानसभा मतदार संघापैकी ३ जागा आपल्याला मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यात १२० पेक्षा जास्त जागा देणार नसल्याचे सांगणाऱ्या कॉंग्रेसने, नागपूर शहरात ३ जागा देण्याची मागणी देखील धुडकावून लावली आहे. त्यामुळे दिल्ली ते गल्ली असा संघर्ष दोन्ही पक्षात येत्या काही दिवस सुरु राहणार असल्याची चिन्हे आहेत. 

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.