महायुती तुटणार? राजू शेट्टी, आठवलेंचा इशारा

जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळं आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयनं दिलाय. 

Updated: Sep 20, 2014, 10:09 PM IST
महायुती तुटणार? राजू शेट्टी, आठवलेंचा इशारा title=

मुंबई: जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळं आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयनं दिलाय. 

उद्या पत्रकार परिषद घेऊन आरपीआय भूमिका जाहीर करणार आहे. यामुळं मात्र महायुतीत जागावाटपाचा वाद टोकाला गेल्याचं चित्र दिसतंय. 

तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नसतांनाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टींनी महायुतीतील घटक पक्षांकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा दिलाय. 

आज आघाडी विरोधात लढतोय उद्या युतीच्या विरोधातही लढू अशी टोकाची भाषा पुणे जिल्हातील खेड तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात बोलतांना दिलाय.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.