IND vs Aus 1st Test BGT 2024-25 Day 3: 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने आत्तापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावात ते मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर जैस्वालने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यशस्वीचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. त्याने 205 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
भारताचा सलामीवीर खेळाडू यशस्वी जयस्वाल हा पर्थ कसोटीत शतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन आणि विराटसारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालचे आता नाव सामील झाले आहे. यशस्वीपूर्वी सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि आता यशस्वीची नावे पर्थमध्ये भारतासाठी कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाली आहेत.
हे ही वाचा: आज होणार 577 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला, एका क्लिकवर मिळवा आयपीएल लिलावाची संपूर्ण
A very special moment early on Sunday morning in the Perth Test as the immensely talented @ybj_19 brings up his maiden Test 100 on Australian soil.
He registers his 4th Test ton
Live -… pic.twitter.com/S1kn2sWI0z
— BCCI (@BCCI) November 24, 2024
यशस्वी जैस्वाल बनला भारतासाठी संकटमोचक
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ फक्त 150 धावांत गारद झाला होता. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी करत 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 104 धावांत ऑलआउट केले. दुसऱ्या डावात भारताला सामन्यात टिकून राहण्यासाठी उत्तम फलंदाजीची गरज होती. अशा स्थितीत यशस्वी जयस्वाल टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने २०१ धावांची सलामी दिली. याशिवाय केएल राहुल ७७ धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने केएल राहुलची विकेट घेतली. या प्रकारे आता भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर आपली पकड घट्ट केली आहे.