संगमनेर: रेल्वे भरती फसवणूक प्रकरणामध्ये पालकांकडून पैसे उकळणाऱ्या शिवाजी केरेची एक व्हिडिओ क्लिप झी मीडियाच्या हाती आली आहे. या व्हिडिओमध्ये केरे पालकांकडून पैसे घेताना स्पष्ट दिसतोय.
संगमनेरमधले एक शिक्षक संजय इंगळे यांच्या घरातला हा व्हिडिओ आहे. हा व्यवहार होत असताना सुनिल जुंधारे या सजग विद्यार्थ्यानं मोबाईलमध्ये ही क्लिप तयार केलीये. या क्लिपमध्ये पांढऱ्या शर्टमध्ये दिसतायत ते आदिनाथ अवटी या विद्यार्थ्याचे वडील कौशिक आहेत. त्यांच्या बाजुला पैसे मोजून देणारे सुनील जाधव या विद्यार्थ्याचे मामा आहेत...
यावेळी आवटी यांनी १ लाख रुपये दिल्याचं दिसतंय. एकूण १० विद्यार्थ्यांचा व्यवहार यावेळी झालाय. म्हणजेच नोकरीचं आमिष दाखवून या एकाच मिटिंगमध्ये तब्बल १० लाख रुपये केरेनं उकळलेत.
या व्हिडिओमधील संवाद -
केरे- बरोबर आहे...
पालक - पाचशे रुपयांच्या ५८ नोटा आहेत...१००० रुपयांच्या ११ नोटा...
केरे- सगळे तुमचे एक चाळीस आहेत ना?
पालक- हो, एक चाळीस आहेत...
पालक- या घ्या पाचशेच्या ५८ नोटा आहेत... १००० रुपयांच्या ११
पालक - पाचशेच्या ५८ नोटा आहेत ना... भाऊ...! त्यात एक हजाराची नोट म्हणजे ६० झाल्यात....
केरे- पाचशेच्या ५८ आणि १००० रुयाची एक नोट ६० झाल्या भाऊ...
म्हणजे ३० हजार झालेत ते... आणि आता १० पाहिजे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.