आता मोशन पॉवर फॅब्रिकने चार्ज करा फोनची बॅटरी!

वैज्ञानिकांनी फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी आता नवा शोध लावलाय. त्यांनी एक डबल लेअर मोशन पॉवर फॅब्रिक तयार केलंय. सिल्व्हर कोटेड विणलेल्या कापडानं आता मोबाईल फोन चार्ज होणार आहे.

Updated: Mar 17, 2015, 01:43 PM IST
आता मोशन पॉवर फॅब्रिकने चार्ज करा फोनची बॅटरी! title=

वॉशिंग्टन: वैज्ञानिकांनी फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी आता नवा शोध लावलाय. त्यांनी एक डबल लेअर मोशन पॉवर फॅब्रिक तयार केलंय. सिल्व्हर कोटेड विणलेल्या कापडानं आता मोबाईल फोन चार्ज होणार आहे.

दक्षिण कोरियामधील (Sungkyunkwan University in South Korea)विद्यापीठानं केलेल्या संशोधनानुसार आपल्या हातात असलेल्या  मोशन पॉवर फॅब्रिकने छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणासह हाताच्या हालचानं फोन चार्ज होईल. 

या खास विणलेल्या कपड्यामध्ये ट्रायबो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, ज्यामुळं काही ठराविक मटेरिअल इलेक्ट्रिकली चार्ज होतात आणि एका कपड्यातून दुसऱ्या कपड्यामध्ये तयार झालेल्या इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. त्यातून एक मटेरिअल पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह चार्ज होतात. 

या कपड्यातील एक लेअर प्लेन सिल्व्हर कोटेड टेक्सटाईल आहे. तर दुसऱ्या लेअरसाठी टीमनं विणलेल्या कापडावर १००-nm-wide झिंक ऑक्साइड नॅनोरॉड्स जोडले. या दोन लेअरमुळेच पॉवर आऊटपूट मिळेल आणि बॅटरी चार्ज होईल. 
 
संशोधक टेक्सटाइल बेस्ड बॅटरी आणि सुपर कॅपॅसिटर्समध्ये या फॅब्रिकचं अधिक परिक्षण करत आहे. जेणेकरून पॉवर स्टोअर करता येईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.