फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील.  देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

Updated: Mar 18, 2015, 10:39 AM IST
फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प  title=

मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील.  देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

दरम्यान राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा आहे, याची जाणीव वेळोवेळी नव्या सरकारमधल्या मंत्र्यांनी करुन दिली आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पामध्ये काही धाडसी निर्णय असतील का याबाबत साऱ्यांनाच कुतुहूल आहे. 

आर्थिक पाहणी अहवालात कृषि क्षेत्रात घट दिसली आहे. गारपीट, अवेळी पाऊस, दुष्काळ या संकटांनी राज्याला झोडपून काढलंय. त्यातच एलबीटी रद्द करण्याचं सरकारसमोर आव्हान आहे. राज्यावर कर्जाचा भार आहे. अशा अनेक संकटांचा सामना सरकारला करायचा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.