24taas

आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

Jan 5, 2015, 09:26 PM IST

‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप

PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

Jan 5, 2015, 08:18 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची?

अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरूस्त असल्याचं कारण देत दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय. 

Jan 5, 2015, 08:01 PM IST

सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार, एक भारतीय जवान शहीद

सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला असून आज दुपारी पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या आठवडाभरात पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची ही चौथी घटना आहे. 

Jan 5, 2015, 07:02 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

Jan 5, 2015, 06:41 PM IST

दोन मुलांना मारून पित्याच्या आत्महत्येनं औरंगाबाद हळहळलं!

पोटच्या दोन मुलांची हत्या करून पित्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं उघडकीस आलं असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे. 

Jan 5, 2015, 05:29 PM IST

महापौरांना बिअरचे टीन पाठवून राष्ट्रवादीचं आंदोलन

ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात विरोधकांनी बियरचे कॅन ठेऊन अनोखं आंदोलन केलं. परवाने रद्द केलेल्या बारमालकांना पुन्हा परवाने दिल्यामुळं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्यासाठी हे टीन आणले होते. मात्र महापौर न भेटल्यानं हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. 

Jan 5, 2015, 05:12 PM IST

व्हिडिओ: जंगली अस्वलानं तोडला एका माणसाचा लचका

जंगली अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात घडलीय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लिप आता हाती आलीय. त्यामध्ये जंगली अस्वल एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत.

Jan 5, 2015, 05:00 PM IST

वर्ल्डकपसाठी टीममध्ये युवराज सिंहला सहभागी करण्याची शक्यता!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

Jan 5, 2015, 04:01 PM IST

बिहारमध्ये पानासोबत कंडोम फ्री!

बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका पान विक्रेत्यानं आपल्या ग्राहकांना पानासोबतच कंडोम मोफत देण्याचं काम सुरू केलंय.

Jan 4, 2015, 10:21 PM IST

त्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. 

Jan 4, 2015, 09:41 PM IST

सचिनला मागे टाकत विराटचे ५० लाख फॉलोअर्स!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी करणार्‍या विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ६ जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार्‍या चौथ्या कसोटीत भारताचं नेतृत्व करणार्‍या विराटला ट्विटरवर फॉलो करणार्‍यांची संख्या ५ मीलियन म्हणजेच ५० लाखांच्यावर पोहोचली आहे. 

Jan 4, 2015, 09:10 PM IST

मोटो G-2ला टक्कर देणार श्याओमी रेडमी 2S, फीचर्स लीक

चीनची स्मार्टफोन कंपनी श्याओमीसाठी 2014 हे वर्ष खूप चांगलं ठरलं. सर्व वाद आणि स्पर्धा असतांनाही जगभरात त्यातल्यात्यात भारतीय बाजारात कंपनीनं MI आणि रेडमी फोन विक्रीवर चांगलाच फायदा मिळवला. 

Jan 4, 2015, 08:14 PM IST