24taas

राज्य सरकारकडून‘पीके’च्या चौकशीसाठी समिती

हिंदू देवतांचा अपमानाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त पीके सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वात समिती नेमल्याची माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी आज दिली.

Dec 31, 2014, 09:00 AM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 31, 2014, 08:42 AM IST

नव्या वर्षात महागणार कार आणि बाइक्स!

नवीन वर्षात स्वयंचलित वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. या उत्पादनांना ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत उत्पादन शुल्कात देण्यात आलेल्या सूट योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्यानं एक जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. या निर्णयामुळं सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल.

Dec 31, 2014, 08:13 AM IST

ताणामुळे 'कॅप्टन कूल' धोनीची निवृत्ती?

ताणामुळे 'कॅप्टन कूल' धोनीची निवृत्ती?

Dec 30, 2014, 05:33 PM IST

टीम इंडियाचा कॅप्टन धोनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं तडकाफडकी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. धोनीच्या या निर्णयामुळं क्रिकेट जगात खळबळ माजलीय.

Dec 30, 2014, 02:51 PM IST

पाहा: आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी चिमुरड्याचा कुत्र्यासोबत लढा

अहमदाबादमध्ये दीड वर्षाच्या मुलीला तिच्या भावानं कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना समोर आलीय. कशिष धनानी असं या मुलाचं नाव आहे.

Dec 30, 2014, 02:29 PM IST

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसंच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली. 

Dec 30, 2014, 02:18 PM IST