सुरजपूर, छत्तीसगढ: जंगली अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात घडलीय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लिप आता हाती आलीय. त्यामध्ये जंगली अस्वल एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत.
लोकांनी आरडाओरड करून अस्वलाला हाकलवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळं अस्वल आणखीच बिथरलं. या अस्वलानं आणखी काही गुरांवरही हल्ला केल्याचं समजतंय. अस्वलानं असा धुमाकूळ घातल्यानं गावकरी प्रचंड घाबरले होते. अखेर पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडून या हिंसाचारी अस्वलाला ठार केलं.
यापूर्वी दिल्लीमध्ये एका प्राणीसंग्रहालयात पांढऱ्या वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना गेल्या सप्टेंबर महिन्यात घडली होती. अस्वलाच्या हल्ल्याच्या या व्हिडिओमुळे त्या घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यायत.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.