दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

Updated: Jan 5, 2015, 06:41 PM IST
दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर title=

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

उद्धव ठाकरेंनी टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन जहाँगिर आर्ट गॅलरीत भरणार असून, या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळालेला निधी ते दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत.

तसंच शुक्रवारी रेल्वे यंत्रणा कोलमडल्यानं प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन जो गोंधळ झाला त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढं चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न 'सामना'तील अग्रलेखातून विचारला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.