सचिनला मागे टाकत विराटचे ५० लाख फॉलोअर्स!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी करणार्‍या विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ६ जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार्‍या चौथ्या कसोटीत भारताचं नेतृत्व करणार्‍या विराटला ट्विटरवर फॉलो करणार्‍यांची संख्या ५ मीलियन म्हणजेच ५० लाखांच्यावर पोहोचली आहे. 

Updated: Jan 4, 2015, 09:10 PM IST
सचिनला मागे टाकत विराटचे ५० लाख फॉलोअर्स!  title=

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी करणार्‍या विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ६ जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार्‍या चौथ्या कसोटीत भारताचं नेतृत्व करणार्‍या विराटला ट्विटरवर फॉलो करणार्‍यांची संख्या ५ मीलियन म्हणजेच ५० लाखांच्यावर पोहोचली आहे. 

या शर्यतीत त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. याआधी सोशल नेटवर्किंग साइटवर कोणत्याही क्रिकेटपटूला ५० लाख फॉलोअर्स मिळालेले नाहीत. सध्या सचिनला फॉलो करणार्‍यांची संख्या आहे ४९,१०,४९८. मात्र विराटनं गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटच्या रणांगणात जबरदस्त कामगिरी करीत क्रिकेटप्रेमींना आपल्याकडे आकर्षित केलं. 

दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. यावेळी कोहलीनं चाहत्यांचे आभार मानले आहेत.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.