आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

Updated: Jan 5, 2015, 09:26 PM IST
आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार? title=

मुंबई: धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानावरून आता पुन्हा एकदा वादळ उठलंय. मुख्यमंत्र्यांच्याच या घोषणेला आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विरोध केलाय. राज्यात आदिवासींचे 24 आमदार आणि 4 खासदार आहेत. हे सर्वपक्षीय आमदार आणि खासदार धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास तीव्र विरोध करतील अशी भूमिका आदिवासी विकास मंत्र्यांनी मांडलीय.

धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचा अनुसुचित जमाती म्हणजेच आदिवासींमध्ये समावेश करावा अशी भूमिका धनगर समाजाचे नेते पूर्वीपासून मांडतायत. आताही आपली तिच भूमिका असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट करून आरक्षण दिलं नाही तर त्यांना आरक्षणच मिळणार नाही, अशी भिती धनगर समाजाच्या नेत्यांना वाटतंय. धनगरांना आरक्षण देण्यासाठी वेगळी सूची तयार करण्याची शिफारस केंद्राकडे करायचा पर्याय अवलंबायचा असेल तर आरक्षण रखडेल अशी भितीही धनगर नेत्यांना आहे.

सत्तेवर आल्यानंतर धनगरांना आरक्षण देऊ अशी घोषणा निवडणुकीपूर्वी भाजपानं केली होती. याचीच आठवण करून देत आता विरोधक याच मुद्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारेत.

निवडणुकीनंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा तसा शांत होता. मात्र नागपूर इथल्या धनगर परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनीच पुन्हा एकदा या मुद्याला हवा दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.