पाटणा: बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका पान विक्रेत्यानं आपल्या ग्राहकांना पानासोबतच कंडोम मोफत देण्याचं काम सुरू केलंय.
पान विक्रेत्या दुकानदाराचं म्हणणं आहे की, यामुळं तो लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. कटिहार जिल्ह्यातील फालका बाजार इथं पानचं दुकान चालवणारे नंदलाल साह म्हणतात, "मी त्या सर्व लोकांना मोफत कंडोम देतो जे माझ्या दुकानात पान खायला येतात. मोफत कंडोम अनेकांना आकर्षित करतात. हे पाऊल लोकांना लोकसंख्येबाबत जागरूक करण्यासाठी उपयुक्त ठरतंय."
साह यांचं वय 40 वर्ष आहे. लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याच्या दिशेनं हा माझा छोटासा प्रयत्न असल्याचं साह म्हणतात.
साह यांनी सांगितलं की, काही खाजगी संस्था, एनजीओ आणि आरोग्य प्रतिनिधी त्यांना मोफत वाटण्यासाठी कंडोम उपलब्ध करून देतात. मात्र अनेक वेळा त्यांच्याकडून न मिळाल्यानं कंडोम विकतच घ्यावे लागतात.
तर दुसरीकडे मोफत कंडोम मिळतात म्हणून साह यांच्या पानाची विक्री पण खूप होतेय. त्यांनी सांगितलं, अनेक लोक मोफत कंडोमसाठी पान खरेदी करतात आणि माझ्या पानाचीही खूप विक्री होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.