मोटो G-2ला टक्कर देणार श्याओमी रेडमी 2S, फीचर्स लीक

चीनची स्मार्टफोन कंपनी श्याओमीसाठी 2014 हे वर्ष खूप चांगलं ठरलं. सर्व वाद आणि स्पर्धा असतांनाही जगभरात त्यातल्यात्यात भारतीय बाजारात कंपनीनं MI आणि रेडमी फोन विक्रीवर चांगलाच फायदा मिळवला. 

Updated: Jan 4, 2015, 08:14 PM IST
मोटो G-2ला टक्कर देणार श्याओमी रेडमी 2S, फीचर्स लीक title=

मुंबई: चीनची स्मार्टफोन कंपनी श्याओमीसाठी 2014 हे वर्ष खूप चांगलं ठरलं. सर्व वाद आणि स्पर्धा असतांनाही जगभरात त्यातल्यात्यात भारतीय बाजारात कंपनीनं MI आणि रेडमी फोन विक्रीवर चांगलाच फायदा मिळवला. 

आता 2015मध्ये कंपनी बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका करणाच्या तयारीत आहे. श्याओमी लवकरच रेडमी 2S लॉन्च करणार असल्याचं कळतंय. जो की रेडमी 1Sचं अपग्रेड वर्जन असेल. नुकतेच या फोनचे फीचर्स आणि फोटो लीक झाले आहेत. 

या फोनची सरळ-सरळ स्पर्धा बाजारात नाव कमावलेल्या मोटो जी-2सोबत होणार आहे. लीक झालेल्या बातमीनुसार, श्याओमीच्या या नव्या फोनमध्ये 4.7 इंचचा डिस्प्ले लागलेला आहे. विशेष म्हणजे फोन LTE म्हणजेच 4जी टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. रेडमी 1एस सारखा हा फोनही अँड्रॉइड फॅमिलीतील असेल आणि अँड्रॉइडचं '4.4.4 किटकॅट'वर आधारित असेल.

'श्याओमी रेडमी 2एस'चे फीचर्स:
- डिस्प्ले - 4.7 (720 p)
- प्रोसेसर - 1.2GHz क्वाड कोअर, स्नॅपड्रॅगन 410
- रॅम - 1 जीबी
- मेमरी - 8 जीबी इंटरनल
- कॅमेरा - 8 मेगापिक्सेल रिअर, फ्लॅश, 2 मेगापिक्सेल फ्रंट
- वजन- 132 ग्राम

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.