24taas

व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!

आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.

Jan 13, 2015, 07:31 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारनं २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 13, 2015, 06:52 PM IST

धक्कादायक: बिअरमध्ये मगरीचा ज्यूस, 69 जणांचा मृत्यू

एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 69 जणांचा बिअर प्यायल्यानं मृत्यू झालाय. 

Jan 13, 2015, 04:33 PM IST

उद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. 

Jan 12, 2015, 09:42 PM IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

Jan 12, 2015, 09:22 PM IST

मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल!

मुंबईकरांचा ट्रेनचा प्रवास आता आणखी सुखाचा आणि गारेगार होणार आहे. मुंबईत लवकरच एसी ट्रेन धावणार आहे. मुंबईकरांसाठी १२ एसी लोकल्स तयार आहेत. त्यापैकी एक लोकल लवकरच धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननं ही घोषणा केलीय. त्याचबरोबर बंबार्डिअरची नवी लोकलही मुंबईत लवकरच धावणार आहे. 

Jan 12, 2015, 09:08 PM IST

फिरोजशाह कोटला मैदानात दिसणार गंभीर, सेहवागचा जलवा!

कॅप्टन गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं दिल्लीला ग्रुप बीमध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दोघंही उद्यापासून ओडिशा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये एकदा पुन्हा दबाव बनविण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. 

Jan 12, 2015, 08:07 PM IST