मापुतो: एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 69 जणांचा बिअर प्यायल्यानं मृत्यू झालाय.
या बिअरमध्ये मगरीच्या पोटात आढळणारा पाचक जठर रस सापडलाय. यामुळं बिअर विषयुक्त झाली आणि ती पिणाऱ्या 69 जणांचा मृत्यू झाला. तर चार डझनहून अधिक लोक अत्यवस्थ आहेत.
ही घटना मोजांबिक देशातील आहे. इथं अंत्यसंस्कारानंतर येणाऱ्यांना पारंपरिक पद्धतीनं बनवलेली बिअर दिली जाते. त्याला बेंबे म्हणतात.
ही बिअर ज्वारी आणि कणिसाच्या बियांनी बनवली जाते. पोलिसांना संशय आहे की, जेव्हा अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक स्मशानात होते, तेव्हा कोणीतरी बिअरमध्ये विष मिसळलं असेल.
पीडितांच्या रक्ताची आणि बिअरची चाचणी केल्यानंतर कळलं की, त्यात मगरीच्या पोटात सापडणारं द्रव्य होतं. मृतकांमध्ये बिअर बनविणाऱ्या महिलेचाही सहभाग आहे. आता पोलीस खाण्याचे आणि गिफ्ट्सचे सर्व पाकिट तपासत आहेत, जे पीडित कुटुंबियांसाठी सर्व लोक घेऊन आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.